वाल्मिक कराडचा मुलगा अडचणीत? बीड नव्हे तर सोलापुरात बंदुकीचा धाक दाखवत...

Walmik Karad Son: वाल्मिक कराड याच्यानंतर आता त्याचा मुलगा सुशील कराडदेखील अडचणीत येणार आहे. त्याच्याविरोधात सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 11, 2025, 09:48 AM IST
वाल्मिक कराडचा मुलगा अडचणीत? बीड नव्हे तर सोलापुरात बंदुकीचा धाक दाखवत...  title=
Walmik Karad Son Problem Rise As Case File In Solpur Court

अभिषेक अदेप्पा, झी मीडिया

Walmik Karad Son: वाल्मिक कराडनंतर आता त्याचा मुलगा सुशील कराडसुद्धा अडचणीत येण्याची  शक्यता आहे. सुशील कराडवर सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सुशीलने त्याच्या मॅनेजरला घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केल्याचा आरोप आहे. पीडित मॅनेजरच्या पत्नीने याबाबत तक्रार दिली आहे. 

वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड यांच्यावर जिल्हा व सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.  मॅनेजरला घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केल्याचा आणि दोन ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोनं बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित मॅनेजरच्या पत्नीनं याबाबत सुशील कराड आणि त्याचा मित्र अनिल मुंडे, गोपी गंजेवार यांच्या विरोधात सोलापूर MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मात्र पोलिसांनी त्याची दखल न घेतल्यानं पीडित महिलेच्या पत्नीनं सोलापूर जिल्हा न्यायालयात फिर्याद दाखल केली आहे. 13 जानेवारीला याबाबत सुनावणी होणार आहे. 

वाल्मिक कराडनंतर आता त्याचा मुलगा सुशील अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. मॅनजरच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीवर काय कारवाई होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बीडनंतर सोलापूरातदेखील ठिणगी पडल्याचे पाहायला मिळतेय. तसंच, ही फिर्याद लवकरात लवकर दाखल करण्यात यावी अशी मागणी पिडीत महिला आणि त्यांच्या वकिलांनी केली आहे. 

विष्णू चाटेला कोर्टासमोर केलं जाणार हजर?

विष्णू चाटेला संतोष देशमुख हत्या प्रकरणात कस्टडी घेण्यासाठी कोर्टासमोर आज हजर केले जाण्याची शक्यता आहे. सीआयडीने कोर्टाकडे तसा अर्ज केल्याची माहिती आहे. खंडणी प्रकरणांमध्ये विष्णू चाटेला काल न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. न्यायलयीन कोठडी मिळताच सीआयडीने विष्णू चाटेला पुन्हा ताब्यात घेतल्याची माहिती आहे. खंडणीच्या प्रकरणात विष्णू चाटे आरोपी आहे. पुरवणी जबाबांमध्ये विष्णू चाटेच नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये आलेलं आहे. खंडणी प्रकरणांमध्ये न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर प्रक्रिया पूर्ण करून विष्णू चाटेला हत्या प्रकरणांमध्ये कोर्टासमोर हजर केलं जाईल अशी माहिती आहे