Mahavikas Aghadi Rebel Candidates: महाविकास आघाडीत बंडखोरीचं पीक आलं आहे. महाविकास आघाडीत ठिकठिकाणी बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत बंडखोरी अटोक्यात आणू असा दावा मविआचे नेते करत होते. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी बंडोबांना थंडोबा करण्यात मविआला अपयश आलं. त्यामुळं मविआला बंडोबा त्रासदायक ठरणार आहेत.
महाविकास आघाडीतली बंडखोरी शमून जाईल असा दावा काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केला होता. पण वस्तूस्थिती मात्र वेगळीच दिसू लागली आहे. महाविकास आघाडीत बंडोबांचा झेंडा कायम असल्याचं उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झालं.
- काटोल मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सलील देशमुखांना काँग्रेसच्या याज्ञवल्क्य जिचकार यांनी अपक्ष म्हणून आव्हान दिलंय.
- पुण्यात कसबा मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना बंडखोर कमल व्यवहारेंनी आव्हान दिलंय.
- पुण्यातल्याच पर्वतीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अश्विनी कदम या उमेदवार असताना काँग्रेसच्या आबा बागुल यांनी पक्षाच्या उमेदवाराविरोधात दंड थोपटलेत
- शिवाजीनगर मतदारसंघात काँग्रेसचे दत्ता बहिरट यांना बंडखोर मनिष आनंद यांनी आव्हान दिलंय
- सावनेर विघानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अनुजा केदार यांच्याविरोधात काँग्रेसचेच अमोल देशमुख यांनी आव्हान दिलंय.
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील बंडखोरांवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिलीय आहे. नाना पटोले तर बंडखोरांच्या संपर्कात असल्याचं म्हणत होते. पण कोल्हापूरसारख्या ठिकाणी त्यांना काँग्रेसच्या बंडखोरांनी गुलीगत धोका दिलाय. एवढंच नव्हे तर विदर्भातही ठिकठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांनी बंडखोरी केली.
बंडखोरांवर फक्त हकालपट्टीची कारवाई करुन चालणार नाही तर त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत. अन्यथा महाविकास आघाडीत बंडखोर मोठी पाडापाडी करतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.
१) विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी ३ वाजता समाप्त,पुणे शहरात असणार ३ बंडखोर उमेदवार,तिन्ही उमेदवार काँग्रेस चे आहेत,मनीष आनंद, कमल व्यवहारे, आबा बागुल हे तिन्ही उमेदवार काँग्रेस चे पुणे शहरात महाविकास आघाडीची शिष्टाई अयशस्वी,कसबा मधून कमल व्यवहारे शिवाजीनगर मधून मनीष आनंद तर पर्वती मधून आबा बागुल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही
२) काटोल विधानससभा मतदारतसंघातून,सलील देशमुख राष्ट्रवादी, शरद पवार गट,चरणसिंग ठाकूर, भाजप या,याज्ञवल्क्य जिचकार यांची काँग्रेस बंडखोरी कायम.अनिल शंकरराव देशमुख, अजित पवार गट,( हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख नव्हे हे दुसरे अनिल देशमुख आहे )
3) वर्धा विधानसभा - सुधीर पांगुळ काँग्रेस (बंडखोर) उमेदवारी मागे,समीर देशमुख ,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - उमेदवारी मागे,डॉ. सचिन पावडे,काँग्रेस , उमेदवारी कायम
4) नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ, कृष्णा खोपडे -भाजप उमेदवार,दुनेश्वर पेठे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उमेदवार, पुरुषोत्तम हजारे--अपक्ष -बंडखोर काँग्रेस उमेदवार
5) सावनेर विधानसभा मतदारसंघ -अनुजा केदार -काँग्रेस उमेदवार,आशिष देशमुख- भाजपा उमेदवार,अमोल देशमुख-- अपक्ष,काँग्रेस बंडखोर उमेदवारी कायम
6) रामटेक विधानसभा मतदारसंघ - आशिष जयस्वाल शिवसेना शिंदे गट उमेदवार,विशाल बरबटे, शिवसेना उद्धव ठाकरे उमेदवार,राजेंद्र मुळक - अपक्ष बंडखोर काँग्रेस उमेदवार,चंद्रपाल चौकसे - अपक्ष काँग्रेस बंडखोर
7) यवतमाळ - वणी विधानसभा मध्ये काँग्रेस बंडखोर संजय खाडे यांची उमेदवारी कायम.
येथे मविआ ने शिवसेना ठाकरे गटाचे संजय देरकर यांना दिली उमेदवारी
8) परतूरमध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार जेथलियांचा अर्ज कायम,भाजपचे लोणीकर विरुद्ध जेथलिया सामना रंगणार,परतूरची जागा उद्धव ठाकरे गटाला सुटल्यानंतर काँग्रेसचे जेथलियांची बंडखोरी