School Holiday: शालेय विद्यार्थ्यांना फेब्रुवारी महिन्यात 'इतक्या' सुट्ट्या! पाहून घ्या कॅलेंडर!

February School Holidays 2025 List:  फेब्रुवारी महिन्यात किती सुट्ट्या मिळणार? जाणून घेऊया.  

Pravin Dabholkar | Updated: Feb 1, 2025, 03:52 PM IST
School Holiday: शालेय विद्यार्थ्यांना फेब्रुवारी महिन्यात 'इतक्या' सुट्ट्या! पाहून घ्या कॅलेंडर! title=
फेब्रुवारी सुट्ट्या

February School Holidays 2025 List: नवीन महिना आल्यावर अनेक नियमांमध्ये बदल होतात. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशीच अर्थसंकल्प जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे सामान्य नागरिकांना आपल्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टींवर होणारा बदल लक्षात आला असेल. दरम्यान शालेय विद्यार्थी आणि त्यांचे पालक दरमहिन्याच्या पहिल्या दिवशी एकूण सुट्ट्या तपासतात. शालेय सुट्ट्यांप्रमाणे पालक विकेंडचा प्लान ठरवतात. विद्यार्थी एन्जॉय करायला किती दिवस आहेत, हे मोजतात. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात किती सुट्ट्या मिळणार? जाणून घेऊया.  

वसंत पंचमीने फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होतेय. शनिवार 1 फेब्रुवारीला असणारा हा सण हा हिंदूंच्या महत्वाच्या सणांपैकी एक सण असून तो 2 फेब्रुवारीला साजरा केला जाईल. संत गुरु रविदास यांची जयंती 12 फेब्रुवारीला आहे. या दिवशी बुधवार असून यानिमित्त शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असेल. 

रविदास जयंतीनंतर 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाणार आहे. यादिवशी शाळा, कॉलेजला सुट्टी असेल. 26 फेब्रुवारी, बुधवारी महाशिवरात्रीची सुट्टी असेल. याशिवाय 2 फेब्रुवारी, 9 फेब्रुवारी, 16 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने शाळांना सुट्टी असेल. काही शाळांना शनिवारीदेखील सुट्टी असते. 

राज्यांच्या सुट्ट्या या संबंधित राज्याप्रमाणे बदलू शकतात. त्यामुळे एखादी सुट्टी महाराष्ट्रात असेल तर ती सुट्टी इतर राज्यात असेलच असे नाही.