दावोसमध्ये विक्रमी करार; महाराष्ट्रात कोणती कंपनी किती गुंतवणूक करणार?

Davos Investment Maharashtra:  या गुंतवणुकीमधून राज्यात तब्बल 15 लाखांवर रोजगार उपलब्ध होणार आहेत.

Pravin Dabholkar | Updated: Jan 23, 2025, 08:57 PM IST
दावोसमध्ये विक्रमी करार; महाराष्ट्रात कोणती कंपनी किती गुंतवणूक करणार? title=
दावोसमध्ये विक्रमी करार

Davos Investment Maharashtra: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमध्ये विक्रमी करार केलेत. दोन दिवसांत तब्बल 15 लाख 70 हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आलेत. जवळपास 54 सामंजस्य करारांवर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केलीय. या गुंतवणुकीमधून राज्यात तब्बल 15 लाखांवर रोजगार उपलब्ध होणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मिशन दावोस फते होताना पाहायला मिळतंय. दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडल्याचं पाहायला मिळतंय.. दावोसमध्ये उद्योजकांनी महाराष्ट्रालाच पसंती दिल्याचं पाहायला मिळालं.दावोस दौऱ्यात विक्रमी गुंतवणूक आणि करार करण्यात आलेत. दावोसमध्ये 2 दिवसांमध्ये तब्बल 15 लाख 70 हजार कोटींची गुंतवणुकीचे करार करण्यात आलेत.. त्यामुळे राज्यात जोरदार गुंतवणूक येणाराय.. या माध्यमातून राज्यात जवळपास 15 लाखांवर रोजगार निर्मिती होणाराय.. मुख्यमंत्र्यांनी तब्बल 54 सामंजस्य करार केलेत.. यापैकी रिलायन्स आणि अमेझॉनसोबत सर्वात मोठे करार झाल्याचं पाहायला मिळालं.. 

कोणती कंपनी किती गुंतवणूक करणार?

रिलायन्स -  3 लाख 5 हजार कोटी

अ‍ॅमेझॉन -  71 हजार 795 कोटी 

हिरानंदानी समूह-51 हजार 600 कोटी

ब्लॅकस्टोन- 43 हजार कोटी

टिमॅसेक कॅपिटल मॅनेजमेंट- 43 हजार कोटी

वर्धान लिथियम -  42 हजार 535 कोटी

टाटा समूह- 30 हजार कोटी

व्हीआयटी सेमिकॉन्स- 24 हजार 437 कोटी

इंडोरामा-  21 हजार कोटी

ईरुलर्निंग सोल्युशन्स-  20 हजार कोटी

दावोसमध्ये झालेल्या 54 करारांपैकी या मोठ्या 10 गुंतवणुकदार कंपन्या आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐतिहासिक कामगिरी करत विक्रमी गुंतवणुकीचे करार केलेत. या उद्योगांमधून रोजगार निर्मितीही महत्वाची आहे. त्यामुळे या करारांची लवकरात लवकर अंमलबजावणी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जातेय.

महाराष्ट्रात 3 लांखाहून अधिक रोजगाराच्या संधी; रिलायन्ससोबतच्या करारात काय झाल?

महाराष्ट्र सरकारने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने 3 लाख 5 हजार कोटी रुपयांचा ऐतिहासिक सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दल माहिती दिली.अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखाली नवीन ऊर्जा, किरकोळ विक्री, आतिथ्य आणि उच्च तंत्रज्ञान उत्पादन यासह विविध क्षेत्रांमध्ये 3 लाखांहून अधिक रोजगार संधी निर्माण झाल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. यावेळी अनंत अंबानी यांनी विकसित भारताच्या उभारणीतील परिवर्तनकारी प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे  कौतुक केले आर.आय.एल. नवीन भारताच्या उभारणीत योगदान देण्यास वचनबद्ध असल्याचे अनंत अंबानी यावेळी म्हणाले. महाराष्ट्राला भारताच्या 5 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे नेण्याच्या प्रयत्नाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. भारत लवकरच पहिली ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणाऱ्या या ऐतिहासिक गुंतवणुकीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनंत अंबानी यांचे आभार मानले.