Eknath Shinde : 'त्यांनी बाळासाहेबांची नाक घासून माफी...' एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Eknath Shinde : बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था काय झालीय बघा? ज्यांनी विचार सोडले त्यांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, या शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. 

नेहा चौधरी | Updated: Jan 23, 2025, 09:05 PM IST
Eknath Shinde : 'त्यांनी बाळासाहेबांची नाक घासून माफी...' एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका  title=

Eknath Shinde :  आज बाळासाहेब ठाकरे यांची 99वी जयंती आहे. त्यानिमित्ताने मुंबईतील बीकेसीत शिवसेनेनं शिवोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. शिंदे म्हणाले की, स्वबळावर निवडणूक लढवणार. पण स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते. निवडणुकीत लढून जिंकण्यासाठी या भुज्यांमध्ये ताकद लागते. आणि घरात बसून लढता येत नाही. तु लढो हम कपडा समालते हैं, असं बोलून निवडणूक जिंकता येत नाही. तसंच कार्यकर्त्यांची मनंही जिंकता येत नाहीत. त्यासाठी कार्यकर्त्यांबरोबर रस्त्यावर उतरून काम करावं लागतं. त्यांच्या सुख दु:खात समरस व्हावं लागतं, या शब्दात त्यांनी उद्घव ठाकरेंवर टीका केली. 

शिंदे पुढे म्हणाले की, म्हणून आज शिवसेना प्रमुखांची जंयती आहे, त्यांना फक्त शिवसेना प्रमुखांची जंयती एवढंच आठवते. मात्र स्मारकात गेल्यावर ज्या लोकांनी बाळासाहेबांची विचार सोडले त्यांना बोलवणार नाही. खरं म्हणजे जे बाळासाहेबांच्या विचारांचे मारक आहेत, ते काय बांधणार स्मारक? अशी परिस्थिती आहे. म्हणून तुम्हाला हे बोलण्याच नैतिक अधिकार नाही. कारण बाळासाहेबांचे विचार 2019 लाच सोडण्याच पाप तुम्ही केलं. म्हणून मी सांगतो त्यादिवशी खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या स्मारकावर जाण्यापूर्वी त्यांनी बाळासाहेबांची नाक घासून माफी मागावी. 

दोन अडीच वर्षात पायाला भिंगरी लावून आपण काम केलं. एकही क्षण आपण वाया घालवला नाही. म्हणूनच विजय मिळाला. विकास कामे चौपट पटीने केली. लोकाभिमूख योजना केल्या आणि विकासही केला. दोन्हीची सांगड घातली. त्यामुळेच राज्यातील जनतेने विश्वास दाखवला. म्हणूनच मी जनतेसमोर नतमस्तक होतो. त्यांनाही वंदन करतो, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.

बाळासाहेबांच्या जयंतीला मिळालेलं हे मोठं गिफ्ट आहे. बाळासाहेब असते तर आज आपल्याला शाबासकी दिली असती. आपली पाठ थोपटली असती. आज लाडक्या बहिणींनी माझा सत्कार केला. हा घरच्यांनी केलेला कौतुक सोहळा आहे. कितीही आपण झेंडे गाडून आले तर घरी आल्यावर आई उंबरठ्यावर आपल्यावरून भाकरी तुकडा ओवाळून टाकते तेव्हा जसा आनंद वाटतो, तसा आनंद माझ्या मनाला झाला आहे. तुम्ही सर्वांनी विश्वास दाखवला. साथ दिली. त्यामुळेच सामान्य शेतकऱ्याचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

बाळासाहेबांनी स्वाभिमान शिकवला. अडीच वर्षात मी किती वर्षाचं काम केलं त्याचं मोजमाप तुम्ही करा. लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर. मी म्हणतो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता देवेंद्र फडणवीस सीएम आहे. मी डीसीएम आहे. डीसीएम म्हणजे डेडीकेटेड टू कॉमन मॅन, असे एकनाथ शिंदे म्हणाले.