छत्रपती शिवाजी महाराज जयंतीवरून विधानसभेत गदारोळ

  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीवरून विधानसभेत गदारोळ झाला. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करण्याची मागणी भाजप आमदार सुरेश हळदणकर यांनी केली. त्याला विरोधकांनी आक्षेप नोंदवला. 

Updated: Dec 15, 2017, 04:10 PM IST
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीवरून विधानसभेत गदारोळ   title=

नागपूर :  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीवरून विधानसभेत गदारोळ झाला. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करण्याची मागणी भाजप आमदार सुरेश हळदणकर यांनी केली. त्याला विरोधकांनी आक्षेप नोंदवला. 

तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय 

तर सरकारनं तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात काही बदल केला नसताना हा मुद्दा का उपस्थित करण्यात आला असा आक्षेप राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीवरून विधानसभेत गदारोळ, छत्रपतींची जयंती तिथीप्रमाणे साजरी करण्याची भाजप आमदार सुरेश हळदणकर यांची मागणी होती. यावर विरोधकांनी नोंदवला आक्षेप नोंदवला.

 वाद का निर्माण केला जातोय - अजित पवार

शिवसेना - भाजपा युतीचे सरकार असताना याबाबत वाद उद्भवला होता, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी एक तज्ज्ञांची समिती नेमली होती, त्या समितीने तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याची शिफारस केली होती, त्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे, आता ज्यावर वाद का निर्माण केला जातोय, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपस्थित केला.

विधानसभेतील ठळक घडामोडी

- छत्रपतींची जयंती तिथीप्रमाणे साजरी करण्याची भाजपा आमदार सुरेश हळदणकर यांची मागणी
- विरोधकांनी नोंदवला आक्षेप
- सरकारने तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यात काही बदल केला नसताना हा मुद्दा का उपस्थित करण्यात आला
- राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी घेतला आक्षेप
- हळदणकर यांचे म्हणणे कामकाजातून काढून टाकण्याची विरोधकांची मागणी
- शिवसेनेचीही वादात उडी, शिवसेनेनेही तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याची केली मागणी
- विरोधकांची आणि सत्ताधाऱ्यांचीही विधानसभेत घोषणाबाजी