Wriddhiman Saha : भारताचा दिग्गज क्रिकेटर ऋद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. शनिवारी शेवटचा रणजी ट्रॉफीचा (Ranji Trophy 2025) सामना खेळल्यावर त्याने निवृत्तीची घोषणा केली. ऋद्धिमान साहाला मागील अनेक वर्षांपासून टीम इंडियात संधी मिळाली नव्हती. 40 वर्षांचा ऋद्धिमान साहा हा देशांतर्गत सामने खेळून त्यात चांगली कामगिरी करत होता. ऋद्धिमान रणजी ट्रॉफीमध्ये बंगाल संघाकडून खेळत होता. सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करून त्याने आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली आणि सर्वांचे आभार मानले.
ऋद्धिमान साहाने टीम इंडियासाठी शेवटचा टेस्ट सामना डिसेंबर 2021 रोजी खेळला होता. तसेच शेवटचा वनडे सामना त्याने नोव्हेंबर 2014 रोजी खेळला होता. त्यानंतर ऋद्धिमान साहाला टीम इंडियात संधी मिळाली नाही. साहाने शनिवारी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, "सुंदर प्रवास आज संपला. मी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त होत आहे. मी पहिल्यांदा 1997 मध्ये क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवले होते, तिथपासून आजपर्यंतचे जवळपास 28 वर्ष लोटली. काय सुंदर प्रवास होता आहे. माझ्या देशासाठी, राज्यासाठी, जिल्हा, क्लब, विद्यापीठ आणि कॉलेजसाठी खेळणे माझ्याकरता गौरवाची गोष्टी राहिली आहे.
हेही वाचा : विराटला भेटण्यासाठी चाहता सुरक्षा जाळीवर चढला, पण नंतर शत्रूसोबतही होऊ नये असं घडलं; Video तुफान व्हायरल
Thank You, Cricket. Thank You everyone. pic.twitter.com/eSKyGQht4R
Wriddhiman Saha (Wriddhipops) February 1, 2025
ऋद्धिमान साहाने भारतासाठी 40 टेस्ट सामने खेळले आहेत. यात त्याने 1353 धावा केल्या आणि दरम्यान 3 शतक आणि 6 अर्धशतक सुद्धा लगावली. साहा भारतासाठी 9 वनडे सामने खेळला असून यात त्याची बॅट जास्त चालली नाही. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही 16 धावा असते. आयपीएलमध्ये साहाने 170 सामने खेळले असून यात त्याने 2934 धावा केल्या आहेत. यात त्याने 1 शतक लागवलं.
ऋद्धिमान साहाने 142 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 7169 धावा केल्या. यात त्याने 14 शतक आणि 44 अर्धशतक लगावली. साहाने लिस्ट ए मधील 116 सामन्यांमध्ये 3072 धावा केल्या आहेत. यात त्याने 3 शतक आणि 20 शतक लगावली.