नागपूर : भाजपा- शिवसेना युती होईल असे वाटते असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पार्टीच्या विदर्भ विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी नागपूर भाजपाकडून 1 कोटींचा धनादेश आणि 4 ट्रक साहीत्य पूरग्रस्तांसाठी देण्यात आले.
भाजपला मागील वेळेपेक्षा राज्यात जास्त जागा मिळतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आता कार्यकर्ते निवडणुकीच्या मोडमध्ये असून तिकीट कुणाला मिळणार याची चर्चा सुरु आहे. तसेच आशीर्वाद मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कार्यकर्त्यांनी तिकीटाची अपेक्षा करणे यात काहीच गैर नसल्याचेही ते म्हणाले. अनेक कार्यकर्त्यांनी आपले आयुष्य निःस्वार्थीपणे पक्षाला समर्पित केलं. जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी देशाची लोकशाही वाचवण्यात मौलिक भूमिका पार पाडल्याची आठवण त्यांनी काढली.
केवळ सत्ता मिळविणे हे भाजपचे ध्येय नाही. राष्ट्र, समाज बदलायचे आहे. लोकशाहीला जिवंत ठेवायचे आहे. काही खासदार, आमदारांना आपल्यामुळेच विजय मिळत असल्याचा समज होतो. मात्र विजय कार्यकर्त्यांमुळे होतो. विजयाचा अहंकार नको. कार्याचे मूल्यांकन होऊन तिकीट वाटप होईल. भाजपमध्ये तिकीट वाटपासाठी कुठलाही 'कोटा' नाही. ज्याला तिकीट मिळेल त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा असे आवाहन त्यांनी केले. नेत्यांच्या मुलं, पत्नीला भाजपमध्ये तिकीट मिळत नाही. पण नेत्याचा मुलगा, नातेवाईक असणे गुन्हा नाही. नेत्याने नव्हे पण जनतेने मागणी केली तरच कुटुंबियांना तिकीट देण्याबाबत विचार होऊ शकतो.
समाजाची सेवा करणं,लोकशाही वाचवणं हे आहे. सत्ता आता आमच्याकडे आहे..आता अनेक जण मोठे नेते झाले.. मात्र त्याकरता अनेक कार्यकर्त्याचा त्याग केला.आयुष्यभर संघर्ष केला. अनेक जण गेल्या वेळेस अखेरच तिकीट द्या म्हणून तिकीट घेतले आणि आता तरी परत आहे.
मुलाला आणि पत्नीकरताही अनेक जण तिकीट मागतात. हे योग्य नसल्याचेही ते म्हणाले. विदर्भात पूर्ण जागा जिंकायच्या आहे. आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात सरकार बनवायचे असून100 टक्के विदर्भात विजयाचा संकल्प त्यांनी यावेळी केला.