फेसबुकवर मैत्री करुन पोलीस कर्मचाऱ्याचा विवाहितेवर अत्याचार; बलात्काराचा गुन्हा दाखल होताच आरोपी फरार

Akola Crime : अकोल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने विवाहित महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.

आकाश नेटके | Updated: Dec 20, 2023, 04:37 PM IST
फेसबुकवर मैत्री करुन पोलीस कर्मचाऱ्याचा विवाहितेवर अत्याचार; बलात्काराचा गुन्हा दाखल होताच आरोपी फरार title=
(प्रातिनिधीक छायाचित्र)

जयेश जागड, झी मीडिया, अकोला : अकोल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करम्यात आला आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपी पोलीस कर्मचारी सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे.

फेसबुकवर मैत्री करून एका विवाहित महिलेवर अतिप्रसंग केल्याची घटना अकोला जिल्ह्यातील अकोट येथे घडली आहे. फेसबुकवर मैत्री करणारा आरोपी हा अकोला पोलीस स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असून शिवम दुबे असे त्याचे नाव आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी पोलीस कर्मचाऱ्याने आधी महिलेसोबत मैत्री केली आणि त्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आरोपीने महिलेला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.

आरोपीने ब्लॅकमेल करुन इच्छेविरुद्ध दोन ते तीनवेळा महिलेसोबत शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर पीडित महिलेने आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. अकोट पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध 376 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शिवम दुबे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मुंबईत वृद्ध महिलेवर अत्याचार

मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचा हद्दीत एका 64 वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आरोपीने महिलेच्या चेहऱ्यावर, डोक्यावर, गुप्तांगावर आणि शरीराच्या इतर अवयवांवर अमानुष वार केले आहेत. आरोपीने पीडित महिलेला रस्त्याच्या कडेला फेकून देऊन घटनास्थळावरून पळ काढला आहे. 

सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आरोपी उमेश गुलाबराव ढोक याने वृद्ध महिलेला घरी सोडतो असे सांगितले होते. त्याच बहाण्याने आरोपी उमेश याने महिलेला त्याच्या घरी नेले. त्यानंतर आरोपीने त्या महिलेवर अत्याचार केले. महिलेने विरोध केल्यावर आरोपीने तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिले आणि तो पळून गेला.