Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांना आपण सर्वजण एक महान अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखतो, मात्र यासोबतच ते एक कुशल रणनीतिकार आणि मुत्सद्दी देखील होते. त्याच्या विचारसरणीची आणि नैतिक सल्ल्याची चर्चा तेव्हापासून आजपर्यंत केली जाते. आचार्य चाणक्यांनी लिहिलेल्या नीतिशास्त्रात त्यांनी मानवी जीवनातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर आपले विचार मांडलंय. असे मानलं जातं की जो कोणी आचार्य चाणक्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालतो, त्याला आनंदी, समाधानी आणि यशस्वी जीवन जगण्यास प्रोत्साहन मिळतं. आचार्य चाणक्य यांनीही पुनर्जन्म सारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. होय, आचार्य चाणक्यानेही आपल्या नीतिशास्त्रात पुनर्जन्माची माहिती दिलीय.
आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की, प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्माच्या जोरावर जीवनात यशस्वी किंवा अपयशी ठरतो. मात्र त्याला त्याच्या पूर्वजन्मातील कर्मानुसारच सुख मिळतं आणि या कर्माच्या आधारे तो सर्व सुख-सुविधांसह सर्व गोष्टी करण्यास समर्थ असतो. ज्यामुळे त्याला आनंद मिळतो. चाणक्य नीतीनुसार माणसाला पृथ्वीवर स्वर्गासारखे सुख मिळतं. मात्र, हा आनंद त्यांना त्यांच्या मेहनतीनंतर मिळतो. कोण आहेत जे पृथ्वीवर स्वर्गासारखे जीवन जगतात.
चांगले अन्न, निरोगी व्यक्ती!
आचार्य चाणक्य मानतात की, ज्याला चांगले अन्न मिळते त्यापेक्षा जास्त भाग्यवान कोणीही नाही. यासोबतच चांगले अन्न मिळण्याची आणि ते पचवण्याची क्षमता असणे हे चांगल्या कर्माचे लक्षण आहे. आचार्य चाणक्याच्या शब्दात सांगायचे झाले तर जो माणूस निरोगी जीवन जगतो तो त्याच्या मागील जन्मी केलेल्या कर्माचे फळ भोगत आहे असे समजावे. हे जीवन एक वरदान असतं या लोकांसाठी.
सुंदर आणि सद्गुणी पत्नी
आचार्य चाणक्य म्हणतात की ज्या पुरुषाला जीवनसाथी म्हणून एक सद्गुणी आणि सुंदर पत्नी मिळत. त्या पुरुषापेक्षा कोणीही भाग्यवान नाही कारण चारित्र्यवान, सद्गुणी आणि सुंदर स्त्री तिच्या मागील जन्माच्या कर्मावर आधारित त्याला प्राप्त होते. याबाबत आचार्य चाणक्य म्हणतात की, एखाद्याला सुंदर स्त्री मिळू शकते पण तिच्यासोबत चांगले चारित्र्य असणे ही मोठी गोष्ट आहे.
पृथ्वीवर श्रीमंत असतात
आपल्या नीतिशास्त्रात सांगितलंय की, जो माणूस श्रीमंत आहे तो या युगातही भाग्यवान आहे. याउलट, जर तुम्ही श्रीमंत होण्यासोबतच परोपकारही करत असाल तर ते तुमच्या सध्याच्या जन्माचे नाही तर तुमच्या मागील जन्माचे फळ आहे आणि ही व्यक्ती चांगली कर्म करते. त्याला पृथ्वीवर सर्व प्रकारचे सुख मिळते आणि त्याला सर्व सुख मिळाले तर त्याला पृथ्वीवर जे सुख स्वर्गासारखे आहे असं मानलं जाईल.