AI Technology: बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानावर कृषी क्षेत्रात वापर करताना उसाच्या पिकाची यशस्वी लागवड केली आहे. याची दखल मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला यांनी घेतली आहे. त्यांनी या प्रयोगाचं कौतुक केलंय.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर म्हणजेच AI तंत्रज्ञानावर कृषी क्षेत्रातही आमुलाग्र बदल होताना दिसत आहेत. बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रामध्ये या तंत्रज्ञानाद्वारे ऊसाची लागवड करण्यात आलीय. या संशोधनाची दखल मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नाडेला यांनी घेतलीय. सत्या नाडेला यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. त्यामुळे अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचं सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळतंय.
भविष्यातील शेती कशी असेल, याला डोळ्यासमोर ठेवून आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून शेतीचा प्रयोग बारामतीमध्ये केलाय. राज्यातील 1000 शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्त्वावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ऊस पिकावर एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे.
16 ते 20 जानेवारीदरम्यान बारामतीतील अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट इथं कृषी प्रदर्शन आयोजित आयोजित केलंय. यामध्ये भविष्यातील शेती कशी असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर केलेला ऊस आणि इतर पिकं याची प्रात्यक्षिकं शेतकऱ्यांना बघायला मिळणार आहेत. बारामतीच्या या कामगिरीचं सातासमुद्रापार कौतुक झाल्यानं अनेकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.