अहमदनगर : साईंच्या तिजोरीतल्या दानात यावर्षी १४० कोटींची भर पडली आहे. गेल्या आर्थिक वर्षात साईंच्या तिजोरीत ३५० कोटींचं दान जमा झाले आहे. शिर्डीच्या साईबाबा संस्थानला येणाऱ्या दानाचा आकडा कोट्यावधींच उड्डाण घेतोय. गेल्या आर्थिक वर्षात साई संस्थानला गेल्या आर्थिक वर्षा पेक्षा तब्बल १४० कोटीच अधिकच दान प्राप्त झालय. साई संस्थानच्या गंगाजळीचा आकाडा आता २ हजार कोटीच्यावर जाऊन पोहोचला.
देशात सर्वाधिक श्रीमंत म्हणून तिरुपतीची गणना केली जात तर महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत म्हणून शिर्डीच्या साईबाबा संस्थान, गेल्या वर्षी नोट बंदी नंतरही दानाच्या आकड्यात कमी झाली नव्हती. साई संस्थानला वस्तु पासुन ते सोन्या पर्यंत साईभक्त दान चढवतात. गेल्या आर्थिक वर्षात साई संस्थानला साईभक्तांनी तब्बल ३५० कोटी रुपयांच दान दिलंय.