Hair Care Routine : गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेले प्रदूषण आणि बदलेली जीवनशैली यामुळे मानवी शरीरावर याचा वाईट परिणाम होतोय. अनेक गंभीर आजार, केसांच्या समस्या या गोष्टी अगदी सामान्य झाल्या आहेत. केस गळणे, केसांची चमक कमी होणे, त्यांची घनता कमी होऊ अनेकांना टाळूला टक्कल पडणे अशा समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. जर यापैकी कोणतीही समस्या तुम्हाला असेल तर आज आम्ही लवंग आणि कापूरचा असा घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायचा फायदा तुम्हाला 15 दिवसांमध्ये दिसेल असं तज्ज्ञ सांगतात.
खोबरेल तेलात कापूर आणि लवंग मिसळून तयार केलेले तेल केसांना पोषण देते आणि केसांच्या मुळांना मजबूत करते, असं तज्ज्ञांनी सांगितलंय.
कापूर हा थंड असून त्यात जंतुनाशक गुणधर्म असतात. ज्यामुळे डोक्यातील कोंडा कमी करण्यास फायदेशीर ठरतो. शिवाय टाळूवर असलेली सूजही कमी करण्यास मदत करतं. कापूरमुळे हलकेपणाची भावना देते आणि यामुळे टाळूमध्ये रक्त परिसंचरण देखील वाढते. यामुळे केसांची मुळे मजबूत होण्यास मदत मिळते.
लवंग केसांना पोषण देत आणि केस तुटणे यातून कमी होतं. त्यातील नैसर्गिक अँटिऑक्सिडंट केसांना निरोगी आणि मजबूत बनवतात. लवंग केसांना नैसर्गिक चमक आणतं आणि निर्जीव केसांना पुन्हा जिवंत करते. नारळाचे तेल, कापूर आणि लवंग यांच्या मिश्रणाने घरी तेल कसे बनवायचं पाहा.
3-4 टीस्पून नारळ तेल
4-5 लवंगा
1 छोटा तुकडा कापूर
सर्वप्रथम खोबरेल तेल थोडे गरम करून गरम तेलात कापूर आणि लवंगा टाका, नंतर काही मिनिटे उकळा, जेणेकरून लवंगाचे गुणधर्म तेलात चांगले मिसळतील. लवंगाचा रंग हलका गडद झाला की त्यात कापूरचा तुकडा टाका. कापूर ताबडतोब तेलात विरघळेल, ज्यामुळे तेलात थंडपणा आणि ताजेपणा येईल. हे तेल थंड करून गाळून काचेच्या बाटलीत ठेवा.
या तेलाने टाळू आणि केसांच्या मुळांना हलक्या हाताने मसाज करा. बोटांनी हलक्या हाताने मसाज करा जेणेकरून तेल मुळांपर्यंत व्यवस्थित पोहोचेल. ते केसांवर किमान 30 मिनिटं राहू द्या. रात्रभर केसांमध्ये ते सोडल्यास आणखी चांगले परिणाम मिळतात. सौम्य शैम्पूने केस धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा या तेलाने मसाज करा.
हे तेल 15 दिवस सतत वापरल्याने केसगळती कमी होते आणि केसांची जाडी वाढते. याशिवाय केसांना पूर्वीपेक्षा जास्त चमक आणि ताकद मिळेल.
खोबरेल तेल, कापूर आणि लवंग यांचं मिश्रण लावल्याने केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळणे कमी होते. हे मिश्रण 15 दिवसांत केसांना मजबुती आणि चमक आणण्यासाठी उपयुक्त ठरतो असं तज्ज्ञ सांगतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)