बाजरीची भाकरी खाऊन कंटाळा आला आहे? बनवा लाडू, जाणून घ्या सोपी रेसिपी

Bajra Ladoo Recipe: जर तुम्हाला बाजरीची भाकरी खाण्याचा कंटाळा आला असेल तर त्यापासून चवदार आणि आरोग्यदायी असे बाजरीचे लाडू करून  पहा.

तेजश्री गायकवाड | Updated: Feb 1, 2025, 05:27 PM IST
 बाजरीची भाकरी खाऊन कंटाळा आला आहे? बनवा लाडू, जाणून घ्या सोपी रेसिपी   title=
Photo Credit: Freepik

How to Make Bajra Ladoo: हिवाळ्यात आवर्जून बाजरीची भाकरी खाल्ली जाते. बाजरी ही भरपूर पोषक तत्वांनी भारतलेली आहे आणि आरोग्यासाठी अनेक फायदे देते. विशेषतः हिवाळ्यात त्याचे पीठ खाल्ल्याने शरीराला छान उब मिळते. पण प्रत्येक वेळी यापासून बनवलेली भाकरी खाणे खूप कंटाळवाणे वाटते. त्यामुळे या सोजनमध्ये  तुम्ही स्वादिष्ट बाजरीचे लाडू बनवून खाऊ शकता. याची रेसिपी खूपच सोपी आहे. चला जाणून घेऊया बाजरीच्या लाडूची सोपी रेसिपी.

लागणारे साहित्य 

  • बाजरीचे पीठ
  • तूप
  • गूळ/खजूर
  • डिंक, वेलची पावडर
  • किसलेले नारळ
  • बारीक चिरलेली ड्राय फ्रुट्स  (बदाम, काजू, अक्रोड) 

जाणून घ्या बनवण्याची पद्धत

  • डिंक फुगेपर्यंत तुपात परतून घ्य. यानंतर, ते हाताने किंवा बेलन्याने  क्रश करा.
  • पॅनमध्ये पांढरे तीळ घेऊन हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. ते भाजल्यानंतर एक विशेष वास येईल ज्यामुळे तीळ भाजले गेले आहेत हे समजण्यास मदत होईल. तीळ भाजल्यानंतर बाहेर काढून बाजूला ठेवा.
  • ड्रायफ्रुट्सही तुपात भाजून बाजूला ठेवा.
  • त्याच कढईत तूप गरम करा आणि या तुपात बाजरीचे पीठ मंद सुगंध येईपर्यंत परत. गॅस बंद करा.
  • मंद आचेवर गूळ हळुवार वितळवून घ्या. जर तुम्ही त्याऐवजी खजूर वापरत असाल तर खजुरातील बिया काढून मिक्सरमध्ये फिरवा. 
  • नंतर भाजलेल्या बाजरीच्या पिठात गूळ किंवा खजूर घाला. सोबतच भाजलेले ड्रायफ्रुट्स, किसलेले नारळ  डिंक, वेलची पावडर आणि डिंक घाला.
  • नीट मिक्स करून मिश्रणाचे छोटे तुकडे करून लाडूचा आकार द्या.
  •  बाजरीचे लाडू तयार आहेत. हे लाडू हवाबंद कंटेनरमध्ये आठवडे स्टोअर केले जाऊ शकतात.