ब्रा घातल्याने होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर? हा दावा किती खरा? तज्ज्ञांची दिलं उत्तर

ब्रेस्ट कॅन्सर हा स्त्रियांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही होऊ शकतो पण याचा जास्त धोका हा स्त्रियांना असतो. कॅन्सरचा हा प्रकार महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणार दुसरं सगळ्यात मोठं कारण सुद्धा आहे. 

पुजा पवार | Updated: Oct 7, 2024, 08:28 PM IST
ब्रा घातल्याने होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर? हा दावा किती खरा? तज्ज्ञांची दिलं उत्तर  title=
(Photo Credit : Social Media)

Breast Cancer : कॅन्सरमुळे दरवर्षी जगातील अनेक लोक आपले प्राण गमावतात. ऑक्टोबर हा महिना ब्रेस्ट कॅन्सर विषयी जनजागृतीसाठी ओळखला जातो.  WHO च्या रिपोर्टनुसार 2022 मध्ये जगभरात 2.3 मिलियन ब्रेस्ट कॅन्सरची प्रकरण समोर आली होती. यात ब्रेस्ट कॅन्सरमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या ही 6 लाख 70 हजार होती. ब्रेस्ट कॅन्सर हा स्त्रियांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही होऊ शकतो पण याचा जास्त धोका हा स्त्रियांना असतो. कॅन्सरचा हा प्रकार महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणार दुसरं सगळ्यात मोठं कारण सुद्धा आहे. अनेक जणांचा असा समज असतो की खूप वेळ ब्रा घातल्याने किंवा खास करून अंदरवायर ब्रा घातल्याने ब्रेस्ट कॅन्सर होतो. याविषयी सीके बिरला हॉस्पिटल गुड़गांवच्या ब्रेस्ट सेंटरचे प्रमुख डॉ. रोहन खंडेलवाल यांनी वैज्ञानिक रिसर्च करून काही दावे केले आहेत. 

ब्रा घातल्याने ब्रेस्ट कॅन्सर होतो का? 

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, कदाचित या सिद्धांतावरून हा गैरसमज सुरू झाला असावा कारण घट्ट ब्रा घातल्याने लिंफॅटिक सिस्टम  ब्लॉक करतात, ज्यामुळे ब्रेस्ट टिश्यूमध्ये टॉक्सिन जमा होते. या सिद्धांतानुसार अंडरवायर ब्रा चा शरीरावर दबाव पडून टॉक्सिन बाहेर पडण्याची प्रक्रिया रोखते. ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. हा विचार अनेक लोकांना विश्वास देणारा आहे. परंतु वैज्ञानिक डेटा याचं समर्थन करत नाही. 

हेही वाचा : शरीरातील हे 5 बदल ठरतात हार्ट अटॅकचे संकेत; दिवसभरातील एक कृती ठरते Silent Killer

 

ब्रा आणि ब्रेस्ट कॅन्सरचा काही संबंध नाही : 

ब्रा घातल्याने ब्रेस्ट कॅन्सर होतो की नाही हे शोधण्यासाठी अनेक अभ्यास करण्यात आल्याचे असे डॉक्टरांनी सांगितले. या अभ्यासात ब्रा घालण्याचा कालावधी, अंडरवायर ब्रा चा उपयोग आणि महिलांच्या अन्य सवयींविषयी अभ्यास केला गेला. परंतु ब्रेस्ट कॅन्सर आणि ब्रा घालणे यात थेट संबंध आढळून आला नाही. यावरून हे सिद्ध होते की ब्रा घालण्याची पद्धत किंवा त्याचा कालावधी कॅन्सरच्या जोखमीवर कोणताही परिणाम करत नाही.

ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे जोखीम घटक : 

ब्रेस्ट कॅन्सर हा शरीरातील पेशींमध्ये होणाऱ्या बदलांमुळे होतो. बहुतेकदा ब्रेस्ट कॅन्सर हा आनुवंशिकता आणि जीवनशैलीच्या निवडीमुळे होतो. यासाठी जबाबदार असणारे घटक म्हणजे वाढते वय, वैद्यकीय इतिहास, अनुवांशिक उत्परिवर्तन, धूम्रपान, मेनोपॉज, मद्यपान,हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी, लहान वयात मासिक पाळी येणे इत्यादी असू शकतात. 

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)