Memes : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर सोशल मीडियावर मजेदार मिम्स, पाहा व्हिडीओ आणि फोटो

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदासाठी झालेली निवडणूक जिंकली आहे. यानंतर विजयाचा जल्लोष संपूर्ण देशभरात पाहायला मिळाला. सोशल मीडियावर तर याबाबत मजेदार पोस्ट देखील पाहायला मिळाले. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 7, 2024, 12:58 PM IST
Memes : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर सोशल मीडियावर मजेदार मिम्स, पाहा व्हिडीओ आणि फोटो  title=

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना ऐतिहासिक विजय मिळाला आहे. त्यांच्या विजयाचे वर्णन अमेरिकेच्या इतिहासातील कोणत्याही नेत्याचे सर्वात मोठे राजकीय पुनरागमन म्हणून केले जात आहे. ट्रम्प चार वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. तसेच, वयाच्या 78 व्या वर्षी निवडून आलेले ते अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष असतील.

ट्रम्प यांच्या विजयाचा परिणाम जगभरात दिसून येत आहे. इतकेच नाही तर ट्रम्प यांच्या शानदार विजयाबाबत सोशल मीडियावर लोक आपल्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत. काही लोक खूप मजेदार पोस्ट देखील शेअर करत आहेत. हे मजेदार मिम्स आपण येथे पाहणार आहोत. 

एका एक्स युझरने ट्रम्पच्या विजयावर एक मजेदार एआय जनरेट केलेला व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ट्रम्प नाचताना दिसत आहेत.

दुसऱ्या युझरने लिहिलं आहे की, ज्यामध्ये ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसत आहेत. ट्रम्प म्हणतात की, मोदी तुम्ही तिसऱ्यांदा जिंकून आलात आणि मी दुसऱ्यांदा जिंकून आलो. 

एका युझरने तर एलन मस्क आणि ट्रम्प यांना भगव्या रंगाचे कपडे एआय जनरेट करुन घातले आहेत.

एकाने व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ट्रम्प आनंदाने कमला हॅरिसला बाय-बाय करताना दिसत आहेत आणि कमला हॅरिस दुःखीपणे आपले सामान घेऊन निघताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर सध्या हे मिम्स धुमाकूळ घालत आगेत.