Union Budget 2023: टॅक्स भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी; 5 लाखांंच्या वरील उत्पन्नगटाला दिलासा?

Union Budget 2023: सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे ते 1 फेब्रुवारीच्या बजेटवरती. त्यामुळे सध्या नोकरदारवर्ग, व्यावसायिक या सगळ्यांचेच लक्ष बजेटकडे लागले आहे. 

Updated: Jan 19, 2023, 12:40 PM IST
Union Budget 2023: टॅक्स भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी; 5 लाखांंच्या वरील उत्पन्नगटाला दिलासा?  title=
Union Budget 2023

Union Budget 2023: सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे ते 1 फेब्रुवारीच्या बजेटवरती. त्यामुळे सध्या नोकरदारवर्ग, व्यावसायिक या सगळ्यांचेच लक्ष बजेटकडे (Budget) लागले आहे. परंतु अनेकदा लोकांना समजतं नाही की जुन्या टॅक्स प्रणाली स्विकारायची की नवी टॅक्स प्रणाली, कारण ज्या सुविधा जुन्या टॅक्स प्रणालीत होत्या त्या नव्या टॅक्स प्रणालीत नाहीत. त्यामुळे करदात्यांची नेहमीच निराशा होत आली आहे परंतु आता त्यांना या बाबतीतही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नव्या टॅक्स प्रणालीत 5 लाखांवरील उत्पन्नावरील लोकांना आता टॅक्स (Tax Benefit) सवलत मिळण्याची शक्यता आहे. जुन्या टॅक्स प्रणालीनुसार, पाच लाखांच्या वरील उत्पन्न गटाला करमुक्त मिळते तीच आता नव्या टॅक्स प्रणालीमध्ये या बजेटमधून मिळणार असल्याची शक्यता आहे. (union budget 2023 5 lakh tax payers may get tax relief in New Tax Regime)

येत्या बजेटमध्ये नवी टॅक्स प्रणाली (New Tax Regime) आणखी आकर्षक करण्यावर सरकारचा भर असणार आहे. झी 24 तासला दिला मिळेल्या एक्स्कुझिव्ह माहितीनुसार, नव्या टॅक्स प्रमाणातील करमुक्त उत्पन्नाची मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे. सध्या नव्या टॅक्स प्रणालीत 1.5 लाख ते 5 लाखांपर्यंत करप्राप्त उत्पन्नावर 5 टक्के आयकर आकारला जातो आहे. तिकडे जे करदाते जुन्या टॅक्स प्रणालीमार्फत (Old Tax Regime) आपल्या उत्पन्नाची नोंद करतात त्यांना पाच लाखांपर्यंत उत्पन्नावर कर माफ असतो त्यामुळे बहुतांश करदात्यांचा ओढा बघयाला मिळतो आहे. त्यामुळे 5 लाखांची करमुक्त उत्पन्नाची मर्यादा नव्या प्रणालीतही लागू करण्यावर सध्या केंद्रीय अर्थमंत्रालय प्राधान्याने विचार सुरु केला असल्याची सूत्रांची माहिती आहे. तेव्हानक्की या उत्पन्नगटाला काय फायदा मिळेल पाहूया... 

एकीकडे पाच लाख उत्पन्न गटावरील लोकांना करमुक्ती मिळण्याची अपेक्षा असतात. या बजेटमधून अनेकांनी काही करमुक्तीच्या आणखी मागण्या केल्या पाहायला मिळते आहे. 2.5 लाख ते 5 लाखांच्या उत्पन्नावर 5% टक्के कर, 5 लाख ते 7.5 लाखांच्या उत्पन्नावर 10 टक्के कर, 7.5 ते 10 लाखांच्या उत्पन्नावर 15 टक्के कर, 10 ते 12.5 लाखांच्या उत्पन्नावर 20 टक्के कर, 12.5 ते 15 लाखांच्या उत्पन्नावर 25 टक्के आणि 15 लाखांच्या उत्पन्नावर 30 टक्के कर अशी पुर्ण करप्रणाली आहे. परंतु यातील 15 लाखांच्या उत्पन्नावर 30 टक्के हा जास्तीचा कर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे त्यामुळे 20 लाखांच्या उत्पन्नावर 30 टक्के असा कर ठेवावा अशी मागणी तज्ञांनी केली आहे. 

काय आहे जुन्या आणि नव्या कर प्रणालीमध्ये फरक?

नवीन कर प्रणालीमध्ये 7.5 लाख ते 10 लाख रूपयांच्या वार्षिक उत्पन्नावर 15 टक्के दराने कर भरावा लागतो परंतु जुन्या कर प्रणालीमध्ये तसं नाही. जुन्या कर प्रणालीमध्ये 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या करदात्यांना 5 लाख ते 10 लाख रूपयांच्या वार्षिक उत्पन्नावर 20 टक्के कर भरावा लागतो. तेव्हा हा फरक 5 टक्क्यांचा फरक आहे.