मुंबई : अण्णाद्रमुकच्या (AIADMK)आमदाराच्या ड्रायव्हरच्या घरावर आयकर विभागाच्या (Income Tax) अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. यावेळी अधिकाऱ्यांना एक कोटी रुपये सापडले. हे पैसे आयकर विभागाने जप्त केले आहेत. सोमवारी सकाळी आयकर विभागाचे (Income Tax) विशेष तपास पथक (SIT) एआयएडीएमकेचे (AIADMK)आमदार आर. के. चंद्रशेखर(R Chandrashekhar)यांचा चालक अलगरासामी याच्या घरी छापा टाकला आणि 1 कोटी रुपयांची रोकड हस्तगत केली.
चंद्रशेखर तामिळनाडूच्या त्रिची जिल्ह्यातील मनाप्पराई मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. अलगरासामी हे गेल्या नऊ वर्षांपासून आमदारांसोबत काम करत होते आणि आयटी अधिकाऱ्यांनी सांगितले की, 500 रुपयांच्या नोटच्या रुपात बेहिशेबी रक्कम जमा केली गेली. कोविलपट्टी गावात थांगापंडीआणि मुरुगनंदम येथील आमदाराच्या अन्य दोन साथीदारांच्या निवासस्थानीही छापे टाकण्यात आले.
2008 पासून मणपाराई विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर चंद्रशेखर आता पुन्हा निवडणूक लढविण्याची मागणी करत आहेत. चंद्रशेखर यांच्यासमवेत डीएमके युतीच्या विरोधात मणिथानेया मक्कल कच्ची (MKM)चे प्रदेश सरचिटणीस पी. अब्दुल समद निवडणूक लढवित आहेत.
निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यापासून तामिळनाडूच्या विविध भागांतून प्रचंड रोकड जप्त केली जात आहे. आयकर आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED)अधिकाऱ्यांनी 15 मार्च रोजी मक्कल निधी मय्यमच्या कोषाध्यक्षांच्या कार्यालय
आणि निवासस्थानात साडे अकरा कोटी रोख रक्कम सापडली.
तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या 234 जागांवर 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर 2 मे रोजी मतमोजणी होईल. यावेळी विधानसभेच्या निवडणुका केवळ एकाच टप्प्यात होत आहेत. यावेळी कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. यासह मतदानाची वेळही एक तासाने वाढविण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली.