महिलेशी अश्लील वर्तणूक करणाऱ्या फिलिपिन्सच्या राष्ट्रपतीचा व्हिडिओ व्हायरल...

रोड्रिगो दुतेर्ते यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात दुतेर्ते आपल्या घरी काम करणाऱ्या महिलेशी अश्लील वर्तणूक करत महिलेच्या खासगी भागाला स्पर्श करण्य़ाचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतांना दिसत आहे. त्यात त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे.

Updated: Apr 1, 2021, 02:36 PM IST
 महिलेशी अश्लील वर्तणूक करणाऱ्या फिलिपिन्सच्या राष्ट्रपतीचा व्हिडिओ व्हायरल... title=

फिलिपिन्स : फिलिपिन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते (Rodrigo Duterte) हे नेहमी कोणत्या ना कोणत्या वादात अडकत असतात. यावेळच्या त्यांच्या पराक्रमामुळे त्यांच्यावर अनेकांनी टीका केली आहे. रोड्रिगो दुतेर्ते यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात दुतेर्ते आपल्या घरी काम करणाऱ्या महिलेशी अश्लील वर्तणूक करत महिलेच्या खासगी भागाला स्पर्श करण्य़ाचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतांना दिसत आहे. त्यात त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे.

अध्यक्ष दुतेर्ते यांचे या संदर्भात स्पष्टीकरण

व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर अध्यक्ष रोड्रिगो दुतेर्ते (Rodrigo Duterte) यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. प्रेसिडेंशल पॅलेसमधून असे म्हटले होते की दुतेर्ते व्हिडिओमध्ये फक्त खेळकर, आणि मनोरंजना करण्याचा प्रयत्न करत आहे. दुतेर्ते यांचा महिलेशी अश्लील वर्तणूक करण्याचा कुठलाही हेतू नाही. असे असले तरी यापूर्वी देखील दक्षिण कोरियामधील आपल्या भाषणाच्या मध्यभागी दुतेर्ते यांनी एका परदेशी फिलिपिनो कामगार महिलेचे चुंबन घेतले होते, त्यानंतर त्याच्यावर खूप टीका झाली होती.

रोड्रिगो दुतेर्ते अनेकदा विवादीत चर्चेत

फिलीपिन्सचे अध्यक्ष रोड्रिगो दुतेर्ते यांनी गेल्यावर्षी एक वादग्रस्त विधान केले होते. ज्यात ते म्हणाले होते की उच्च-सीमाप्रमुख प्रमुख सीमाशुल्क अधिकाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी ड्रग तस्करांना गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासह त्यांनी ज्यांना लॉकडाउनवर विश्वास नाही. व जे आपल्या घराबाहेर येतील आशाना गोळ्या घातल्या जातील. असे ते म्हणाले होते.