पैशांची बातमी; 2025 मध्ये किती टक्क्यांनी वाढणार तुमचा पगार? 'या' क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची चांदी

Salary Increment in FY 2025: नोकरीला असणाऱ्या प्रत्येकालाच आवश्यकता असते ती म्हणजे पगारवाढीची. किंबहुना ही पगारवाढच कर्मचाऱ्यांसाठी अनेकदा प्रोत्साहनाचं काम करते.   

सायली पाटील | Updated: Jan 15, 2025, 09:30 AM IST
पैशांची बातमी; 2025 मध्ये किती टक्क्यांनी वाढणार तुमचा पगार? 'या' क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची चांदी  title=
job news average salary hike projected to be 9 point 4 percent in the year 2025

Salary Increment in FY 2025: चालू आर्थिक वर्ष पूर्ण होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असतानाच नव्या आर्थिक वर्षाच्या दृष्टीनं नवी आर्थिक धोरणं राबवली जाण्याकडे देशातील अर्थमंत्रालयाचा कल दिसत आहे. बहुविध क्षेत्रांची आर्थिकदृष्ट्या होणारी प्रगती हा मुद्दा इथं केंद्रस्थानी असतानाच सामान्य जनता पगारवाढीच्या चक्रात अडकल्याचं पाहायला मिळत आहे. 

वर्षभरासाठी एखाद्या संस्थेमध्ये अहोरात्र काम करत मेहनत घेणाऱ्या नोकरदार वर्गासाठी नव्या वर्षाची सुरुवात होताच वेध लागतात ते म्हणजे पगारवाढीचे. चालू आर्थिक वर्ष संपत असतानाच नव्या आर्थिक वर्षात आपल्या वाट्याला नेमकी किती पगारवाढ येणार याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. याच पगारवाढीसंदर्भातील आकडेवारीसुद्धा नुकतीच समोर आली आहे. 

एका सर्व्हेक्षणातून समोर आलेल्या वृत्तानुसार विविध क्षेत्रांमध्ये विविध हुद्द्यांवर नोकरी करणाऱ्यांना सरासरी 9.4 टक्के इतकी पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक वृद्धी आणि कुशल प्रतिभेची वाढ हे यामागचे संकेत असून, मर्सर या एचआर कन्सल्टन्सी कंपनीच्या सर्व्हेक्षणानुसार मागील पाच वर्षांमध्ये कर्मचाऱ्यांचा पगार सातत्यानं वाढला आहे. 

किती टक्क्यांनी वाढणार पगाराचा आकडा? 

2020 मध्ये झालेल्या 8 टक्क्यांच्या पगारवाढीच्या तुलनेत यंदाचा आकडा काही प्रमाणात वाढलेला असून, तो 9.4 टक्क्यांदरम्यान राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या सर्व्हेक्षणामध्ये विविध उपभोक्ता वस्तू, आर्थिक सुविधा, वाहन उत्पादन, यांत्रिक आणि तांत्रिक क्षेत्रातील काही कंपन्यांनी सहभाग घेतला होता. परिणामस्वरुप यंदाच्या वर्षी वाहन उत्पादन आणि तत्सम क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार 10 टक्क्यांनीसुद्धा वाढू शकतो असा अंदाज आहे. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : उत्तरायणात हवामान बदलांचे संकेत, ऊन-वारा- पाऊस अन् बरंच काही; पाहा सविस्तर वृत्त 

गेल्या वर्षीच्या आकड्यांचा आधार घ्यायचा झाल्यास याच क्षेत्रात साधारण 8.8 टक्के इतकी पगारवाढ झाली होती. येत्या आर्थिक वर्षात इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये 9.7 टक्के पगारवाढीची शक्यता आहे. मर्सरच्या ‘इंडिया करियर लीडर’ मानसी सिंघल यांच्या माहितीनुसार भारतात कुशल कर्मचाऱ्यांच्या वाढत्या प्रमाणामुळं वगारवाढीचा आकडाही मोठ्या फरकानं वाढताना दिसत आहे.