नवी दिल्ली : उघड्यावर शौच न करण्याबद्दल जागरूकता निर्माण करणारा चित्रपट म्हणजे ‘टॉयलेट : एक प्रेम कथा.' २ ऑक्टोबरला केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाला तीन वर्ष पूर्ण होणार असल्याने अक्षय कुमारचा ‘टॉयलेट : एक प्रेम कथा' हा चित्रपट रुग्णालयात दाखवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशातील स्वच्छतेबद्दल लोकांना प्रोत्साहीत करण्यासाठी याचा फायदा होईल.
स्वास्थ्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "हा चित्रपट दाखवण्याचा मुख्य उद्देश हा आहे की, उघड्यावर शौच करण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलणे आणि घरत शौचालय बांधण्यास लोकांना प्रवृत्त करणे." मंत्रालयाने केंद्र सरकारच्या सगळ्या रुग्णालयात हा चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर सर्व राज्यातील अधिकाऱ्यांना पत्र लिहून राज्य सरकारी इस्पितळात देखील चित्रपट दाखवावा, असे सूचित करण्यात आले आहे.
अधिकाऱ्याने सांगितले की, "चित्रपट दाखवणे अनिवार्य नाही आहे. या निर्णयाचे पालन करायचे की नाही याबद्दल राज्य स्वतंत्र आहे." मंत्रालयाने पत्राबरोबरच २० इस्पितळांना आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सूचित केले आहे.