Viral Video : 14 फेब्रुवारी रोजी जगभरात व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) साजरा करण्यात आला. यादिवशी प्रेमी जोडपी एकमेकांप्रती आपलं प्रेम व्यक्त करतात एकमेकांना आवडत्या भेटवस्तू देत असतात. पण गुरुग्राममध्ये एक वेगळीच घटना समोर आली आहे. यात एका मुलीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडला धडा शिकवून बदला घेण्यासाठी डिलिव्हरी पार्टनरकडून त्याच्या घरी एक दोन नाही तर तब्बल 100 पिज्जा बॉक्स पाठवले. एवढंच नाही तर तिने सर्व बॉक्स कॅश ऑन डिलिव्हरीवर ऑर्डर केले असून यापैकी एकाही पिझ्झाचे पैसे दिले नव्हते.
व्हिडीओमध्ये दाखवल्या प्रमाणे गर्लफ्रेंडने 100 पिझ्झाचे बॉक्स कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन वापरून पाठवले होते. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मॅजिकपिन एक फूड डिलिव्हरी अँपचा डिलिव्हरी पार्टनर पिझ्झाचे बॉक्स घेऊन ग्राहकाच्या (एक्स बॉयफ्रेंड) घरी जाताना दिसतो. त्याने ग्राहकाच्या दरवाजासमोर पिझ्झा बॉक्सचा डोंगर उभा केलेला दिसतो. तसेच तो अजून पिझ्झे आणून तिथे ठेवत असतो.
व्हिडीओमध्ये मॅजिकपिनचे डिलिव्हरी गर्लफ्रेंडने डिलिव्हरीचा पत्ता दिल्या प्रमाणे पिझ्झाचे बॉक्स तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या दरवाजाबाहेर आणून ठेवताना दिसत आहेत. दरवाजासमोर तीन रॅक लागलेले दिसत आहेत. एक्स अकाउंटवर टाइम्स अलजेब्राने रिपोर्टमध्ये म्हटले की, 'व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मुलीने एक्स-बॉयफ्रेंडचा बदल घेतला. गुरुग्रामच्या 24 वर्षीय आयुषी रावत हिने व्हॅलेंटाईन डे ला एक्स-बॉयफ्रेंडच्या घरी 100 कॅश ऑन डिलिव्हरी पिझ्झा पाठवले. मुलीने ज्या पत्त्यावर हे पिझ्झा पाठवले होते त्या सेक्टर 53 निवासी यश सांघवी यांचा डिलिव्हरी पार्टनरशी वाद झाला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
हेही वाचा : महाराष्ट्रातील 'या' ठिकाणांवर झालंय छावा चित्रपटाचं शूटिंग, मुंबईपासून हाकेच्या अंतरावर
AMAZING Girl seeks revenge from Ex-Boyfriend on Valentine's Day
24-year-old Ayushi Rawat from Gurgaon sent 100 cash-on-delivery pizzas to her ex-boyfriend’s house on Valentine’s Day.
Yash Sanghvi, a resident of Sector 53, ended up arguing with the delivery person pic.twitter.com/EF3CYvjBWM
— Times Algebra February 14, 2025
व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया नोंदवल्या असून काही जणांनी याला फूड डिलिव्हरी कंपनीचा मार्केटिंग स्टंट म्हटले आहे. तर काहींनी हे घटना हास्यास्पद असल्याचे म्हंटले. काही नेटकऱ्यांनी या घटनेची निंदा केली आहे.