नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडुणकीचा निकाल (Delhi Assembly Election Result 2020) आज 11 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. निकाल जाहीर होताच स्पष्ट होईल की, भारतीय जनता पक्ष 21 वर्षाने दिल्लीच्या सत्ते येणार की नाही? की अरविंद केजरीवल हॅट्रिक करत तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. 70 जागांचे निकाल तुम्हाला सर्वात अगोदर Zee24Taas पाहता येणारच आहे. पण त्याचबरोबर मराठी वेबसाइटवर https://zeenews.india.com/marathi देखील पाहता येणार आहे.
Delhi Elections 2020: Counting of votes today
Read @ANI Story | https://t.co/pV81IpEpJN pic.twitter.com/FiOK5RKDu6
— ANI Digital (@ani_digital) February 11, 2020
राजधानी दिल्लीचा कौल कुणाला याचा फैसला आज होणार आहे. दिल्ली विधानसभेची आज मतमोजणी होणार असून दिल्लीवर कोण राज्य करणार याची उत्सुकता साऱ्या देशाला लागलीये. दरम्यान दिल्लीत पुन्हा आम आदमी पक्षच सत्तेवर येणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलनं वर्तवलाय.
#DelhiElections2020: An Aam Aadmi Party (AAP) supporter reaches Delhi Chief Minister Arvind Kejriwal's residence with his children. Counting for all 70 assembly seats in Delhi to begin at 8 am. pic.twitter.com/jFG9M6VZ4W
— ANI (@ANI) February 11, 2020
Manoj Tiwari, BJP Delhi Chief: I am not nervous. I am confident that it will be a good day for BJP. We are coming to power in Delhi today. Don't be surprised if we win 55 seats. #DelhiResults pic.twitter.com/3xPHnd6qNf
— ANI (@ANI) February 11, 2020
मात्र भाजपनं ही निवडणूक प्रतिष्ठेची करत दिल्लीत सत्ता स्थापनेचा दावा केलाय. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ६७२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शनिवारी यासाठी मतदान पार पडलं
Delhi: BJP leader Vijay Goel offered prayers at Hanuman Temple in Connaught Place. Counting for all 70 assembly seats in Delhi to begin at 8 am. #DelhiResults pic.twitter.com/CDbtQXGAqC
— ANI (@ANI) February 11, 2020
दिल्लीत ६२. ५९ टक्के मतदान झालंय. जे लोकसभा निवडणुकीपेक्षा दोन टक्के जास्त आहे. मात्र मतदान संपून २४तास उलटले तरी निवडणूक आयोगानं मतदानाची अधिकृत आकडेवारी जाहीर न केल्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आश्चर्य व्यक्त केलं. या आक्षेपानंतर निवडणूक आयोगानं रविवारी आकडेवारी जाहीर केली. आता आज दिल्लीकरांनी कोणाला कौल दिलाय हे कळणार आहे.