मुंबई : अनेक दिग्गज आणि सेलिब्रिटींची आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर या नेहमी स्थानिक आणि पारंपारिक अन्नपदार्थ खाण्यावर भर देतात. यांच्या टीप्स अगदी सहज, सोप्या असून जास्त खर्चिक नसतात. त्यामुळे आपल्या व्यस्त जीवनशैलीत देखील आपण त्या पाळू शकतो. त्यांनी पिंपल्स दूर ठेवण्यासाठी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर काही डाएट टीप्स शेयर केल्या. उन्हाळ्यात मिळणारी ही फळ आणि खाल्ले जाणारे पदार्थ पिंपल्स वाढीला प्रतिबंध करतात.
तुम्हाला माहित आहे का? काजूच्या फळात संत्र्यापेक्षा पाचपट जास्त व्हिटॅमिन सी असतात. तसंच त्यात भरपूर मिनरल्स असतात. त्यामुळे पिंपल्स येण्याआधीच त्याला आळा बसतो. संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हे फळ अवश्य खा.
फणसातील व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडेन्ट मुळे इम्म्युनिटी सुधारते. हार्मोन्स स्त्रवण्याची क्रिया नियमित होते आणि testosterone ची पातळी संतुलित राहते व त्वचा नितळ होते. तुम्ही फणस दिवसभरात कधीही खाऊ शकता.
नारळपाण्यामुळे शरीर हायड्रेट होते व शरीरातील इलेकट्रॉईट बॅलन्स राखला जातो. तसंच त्यामुळे शरीरातून सगळे टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. दुपारच्या आधी केव्हाही किंवा जेवणाआधी नारळपाणी प्या.
गुलकंदात अँटीबॅक्टरील आणि अँटिव्हायरल गुणधर्म असतात. त्यामुळे पोटातील चांगल्या बॅक्टरीयांच्या (गट बॅक्टरीया) वाढीस चालना मिळते. तसंच पिंपल्समुळे चेहऱ्यावर राहणारे डाग कमी करण्यास मदत होते. म्हणून दुपारच्या व रात्रीच्या जेवणानंतर अर्धा चमचा गुलकंद खा.
हलीममध्ये आयन आणि इतर मिनिरल्सने मुबलक प्रमाणात असतात. खोबरं आणि गुळात हलीम एकत्र करून खाल्यास त्वचा तजेलदार होते व तुमची एनर्जी लेव्हल सुधारते. दिवसभरात केव्हाही तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता.