Microplastics found in human brain : कधीच नष्ट होत नाही किंवा खराब होत नाही. असा पदार्थ म्हणजे प्लास्टिक. संपूर्ण जगासाठी धोकादाय ठरत असलेले प्लास्टिक थेट मानवी मेंदूत पोहचले आहे.आजपर्यंतचे सर्वात धक्कादायक संशोधन समोर आले आहे. मानवी मेंदूत प्लास्टिक सापडल्याने वैज्ञानिकही भयभित झाले आहेत. साधारण हे चमचाभर प्लास्टिकचे तुकडे आहेत. प्लास्टिक केवळ आपल्या सभोवतालची हवा, पाणी, अन्नच नाही तर आपल्या शरीराच्या विविध भागांमध्येही पोहोचल्याचे या संशोधनातून सिद्ध झाले आहे.
2024 मध्ये शवविच्छेदना दरम्यान गोळा केलेल्या सामान्य मानवी मेंदूच्या नमुन्यात आठ वर्षांपूर्वीच्या नमुन्यांपेक्षा खूपच जास्त प्रमाणात नॅनोप्लास्टिक्स आढळून आले आहे. या अभ्यासाचे प्रमुख शास्त्रज्ञ मॅथ्यू कॅम्पेन यांनी सांगितले की, मृत शरीराच्या मेंदूच्या नमुन्यांमध्ये त्यांच्या मूत्रपिंड आणि यकृतापेक्षा सात ते 30 पट जास्त नॅनो प्लास्टिक (प्लास्टिकचे छोटे तुकडे) आढळून आले. हे प्रमाण सुमारे एक चमचे इतके आहे.
2016 च्या शवविच्छेदनात गोळा केलेल्या मेंदूच्या नमुन्यांपेक्षा सध्या केलेल्या संशोधनात 50 टक्के जास्त प्लास्टिकचे कण आढळले आहेत. मेंदूच्या 99.5 टक्के भागात प्लास्टिक आढळून आले आहे. डिमेंशिया असलेल्या 12 लोकांच्या मेंदूमध्ये निरोगी मेंदूंपेक्षा तीन ते पाच पट जास्त प्लास्टिकचे तुकडे असल्याचे संशोधकांना आढळले. हे तुकडे इतके बारीक होते की ते उघड्या डोळ्यांनी दिसत नव्हते. हे मेंदूच्या धमन्या आणि नसांच्या भिंतींमध्ये तसेच मेंदूच्या रोगप्रतिकारक पेशींमध्ये अत्यंत सूक्ष्म असे हे प्लास्टिकचे कण आढळून आलेत. ही अतिशय चिंतजाण क असल्याची भिती संशोधकांनी व्यक्त केली.
डिमेंशिया आजारात मेंदूला रक्त पुरवठ्यात अडथळा येतो आणि ड्रेनेज सिस्टम खराब होते. डिमेंशियाशी संबंधित सूजलेल्या पेशी आणि मेंदूच्या ऊती प्लास्टिकसाठी सिंक म्हणून काम करू शकतात अशी भीती निर्माण झाली आहे. मायक्रोप्लास्टिक्स आणि अल्झायमर आणि पार्किन्सन सारख्या न्यूरोडीजनरेटिव्ह रोगांमध्ये खोल संबंध असू शकतो. मायक्रोप्लास्टिक शरीराच्या पेशींना नुकसान पोहोचवू शकते. हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि कर्करोग यांसारख्या आजारांचा धोका वाढण्याची भिती आहे. अन्न आणि पाण्याद्वारे मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीरात प्रवेश करते.