कानात पाणी गेल्यामुळे, वॅक्स जमा झाल्यामुळे, इंफेक्शन किंवा टॉन्सिल वाढल्याने कानदुखीची समस्या उद्भवते.
Updated: Jun 11, 2018, 08:27 AM IST
मुंबई : कानात पाणी गेल्यामुळे, वॅक्स जमा झाल्यामुळे, इंफेक्शन किंवा टॉन्सिल वाढल्याने कानदुखीची समस्या उद्भवते. त्यामुळे ऐकू कमी येते, डोके दुखू लागते. थंड वातावरणात कानदुखीची समस्या अधिक बळावते. इंफेक्शनमुळे किंवा चोंदलेल्या नाकामुळे थंडीत कानदुखीची समस्या वाढते. अशावेळी कानात मळ साचून राहतो. हा त्रास दूर करण्यासाठी अनेकजण इअर बर्डस वापरतात. पण वेदना खूप वाढल्यास पेनकिलरचा पर्याय निवडला जातो. मात्र ही समस्या वाढली असल्यास डॉक्टरांचा सल्ला वेळीच घेणे अत्यंत गरजेचे आहे. पण वेदना कमी असल्यास या सोप्या घरगुती उपायांनीही आराम मिळेल.
तेल
मोहरीचे तेल हलके गरम करुन त्याचे काही थेंब कानात घाला. थोड्याच वेळात आराम मिळेल. मोहरीचे तेल नसल्यास बदामाचे तेलही वापरु शकता.
कांदा
इंफेक्शनमुळे कान दुखत असेल तर यावर कांदा अतिशय उपयुक्त ठरतो. कांद्याचा रस काढून तो हलका गरम करा आणि त्याचे १-२ थेंब कानात घाला. आराम मिळेल.
अॅपल सिडार व्हिनेगर
अॅपल सिडार व्हिनेगर, कानाची पीएच लेव्हलवर प्रभाव करते. याचे काही थेंब कानात घातल्याने कानातील बॅक्टेरीया किंवा व्हायरस नष्ट होतात. या व्हिनेगरचे १-२ थेंब कॉटन बडवर घाला आणि ते कानात घाला. अॅपल सिडार व्हिनेगरमध्ये केमिकल्स नसतात, त्यामुळे याचा वापर अधिक योग्य ठरेल.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.