Chhaava : इथं तिकिट मिळेना अन् 'या' शहरात आठवडाभरा महिलांना मोफत पाहता येणार 'छावा'

Chhaava Free to Watch : 'छावा' या चित्रपटाचे तिकिट मिळणं कठीण झालंय आणि या शहरात चक्क महिलांना मोफत पाहता येणार आहे चित्रपट

दिक्षा पाटील | Updated: Feb 17, 2025, 04:10 PM IST
Chhaava : इथं तिकिट मिळेना अन् 'या' शहरात आठवडाभरा महिलांना मोफत पाहता येणार 'छावा'
(Photo Credit : Social Media)

Chhaava Free to Watch : सध्या सगळीकडेच विकी कौशलच्या 'छावा' या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच सगळ्यांना या चित्रपटाविषयी उत्सुकता होती. अखेर जेव्हा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला त्यानंतर प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे. 3 दिवसात या चित्रपटाचं त्याच्या बजेटच्या पैशांची वसूली केली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकांना तिकिटं देखील मिळत नाही आहे. अशात महिलांना आठवडाभर 'छावा' चित्रपट मोफत पाहता येणार आहे. त्या संबंधीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आता कुठे आणि कसं हे जाणून घेऊया.

आमदार संग्राम अरुणकाका जगताप यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत महिलांना कसा 'छावा' हा चित्रपटात मोफत पाहता येणार आहे, याविषयी सांगितलं आहे. "14 फेब्रिवारी 2025 रोजी या महाराष्ट्राचा आणि हिंदुस्तानचा एक इतिहास आपल्यासमोर चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या पाहण्या करता प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटाचं नाव आहे 'छावा'. हा चित्रपट ज्यांच्यावर आहेत ते धर्मवीर संभाजी महाराज यांचा चित्रपट आहे. अशात महिलांना मोफत चित्रपट पाहता यावा यासाठी मी एक चांगलं नियोजन केलेलं आहे. त्यासाठी आम्ही तुमच्या सगळ्यांसोबत एक नंबर जाहिर करतोय. त्यानंबरच्या माध्यमातून ज्या-ज्या आमच्या माता-भगिणींना.. फक्त महिलांसाठी ही संधी उपलब्ध होणार आहे. त्यांच्यासाठी एक मोफत स्क्रिनींनी, मोफत शो आयोजित करण्यात आलेला आहे." 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by MLA Sangram Arunkaka Jagtap (@sangram.jagtap)

पुढे संग्राम अरुणकाका जगताप यांनी सांगितलं की, "त्यासाठी आपण सगळ्यांनी हा चित्रपट पाहावा अशी विनंती आहे. एक महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराचांचा विचार होता आणि त्यांच्या विचारानं महाराष्ट्र उभा राहिला देश उभा राहिलेला आहे. तर त्यांचे पुत्र धर्मवीर संभीजा महाराज यांच्यावर आधारीत हा चित्रपट आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी हा चित्रपट अवश्य पाहावा अशी एक नम्रतेची विनंती अहिल्यानगर वासियांना आणि महाराष्ट्राच्या हिंदू भावंडांना मी विनंती करतोय. तर महिलांकरता जे मोफत स्क्रिनिंग आम्ही आयोजित केलं आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्याच्यावर तुम्ही संपर्क करा. तुमची कोणती वेळ असेल आणि त्या प्रमाणे तुम्हाला तिकिट उपलब्ध करुन देण्यात येतील. धन्यवाद, जय हिंद, जय शिवराय. जय श्रीराम"

याशिवाय त्यांनी पुढे पोस्टमध्ये कोणत्या नंबरवर संपर्क करायचा इथं पासून कुठे कोणते आणि किती वाजता शो असणार याविषयी देखील माहिती दिली आहे.