मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात मोठा व्हिलन आणि कॉमेडिअन शक्ती कपूरचा 3 सप्टेंबरला वाढदिवस. क्राइम मास्टर गोगो आणि नंदू, बलमा सारखे लोकप्रिय कॅरेक्टर शक्ती कपूर यांनी साकारले आहेत. शक्ती कपूर यांच खरं नाव सिंकदरलाल कपूर आहे. शक्ती कपूर यांनी 100 हून अधिक सिनेमांत काम केलं आहे.
2005 मध्ये अशी बातमी आली होती की, एका वृत्तवाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनमुळे फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर शक्ती कपूर यांच्या खाजगी आयुष्यात देखील भूकंप आणला होता. या स्टिंगमध्ये मुलींना सिनेमांत काम देण्यासाठी शक्ती कपूर सेक्सुअल फेव्हर मागत असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं होतं. शक्ती कपूरचं हे स्टिंग ऑपरेशन आल्यानंतर फिल्म अण्ड टेलिव्हीजन गिल्ड ऑफ इंडियाने बंदी आणली होती. मात्र ही बंदी अवघ्या आठवड्याभरातच उठवण्यात आली.
या स्टिंगनंतर त्यांच्या कुटुंबात तणावाच वातावरण निर्माण झालं. हे स्टिंग ऑपरेशन बाहेर आल्यानंतर जेव्हा ते घरी जात होते. तेव्हा मुलगी श्रद्धा कपूरने मला फोन केला. आणि तिला याचा खूप मोठा धक्का बसला असल्याचं कळलं. तेव्हा शक्ती कपूर यांची पत्नी अमेरिकेत होती. ती जर भारतात असती तर तिने मला मारूनच टाकलं असतं. अस शक्ती कपूर यांनी सांगितलं होतं. लोकं माझ्याशी असं वागत होते जसं की मी दहशतवादी आहे.
त्यानंतर शक्ती कपूर हे मंदिरात गेले आणि देवाशी खूप भांडले. तू हे चांगल केलं नाही असं सतत देवाला सांगत राहिले. पण त्यानंतर हे प्रकरण कालांतराने शांत झालं. आज त्यांच्या वाढदिवसादिवशी त्यांच्या उत्तम कामासोबतच या कडू आठवणी आल्याशिवाय राहत नाही.