Samay Raina Joked on Rare Disease of A Child : गेल्या अनेक दिवसांपासून स्टॅन्ड-अप कॉमेडियन रैना चर्चेत आहे. गेल्या आठवड्यात त्याच्या यूट्यूब शो 'इंडियाज गॉट लेटेंट' मध्ये युट्यूबर रणवीर अलाहबादिया आई-वडिलांवर अश्लील कमेंट केल्यानं वाद झाला. या सगळ्यात एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात तो 2 महिन्याच्या बाळाच्या दुर्मिळ आजरावर आणि 16 कोटींच्या इंजेक्शनवर खिल्ली उडवली. त्याच्या शोमध्ये असलेल्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. पण हे पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. रणवीर शौरीनं देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
समय रैना या व्हिडीओत म्हणाला, 'तर ना एक 2 महिन्यांचा मुलगा आहे आणि त्याला काही तरी झालंय. त्याच्या उपचारासाठी जे इंजेक्शन आहे त्याची किंमत ही 16 कोटी आहे.' त्यानं पुन्हा एकदा हे वाक्य रिपीट केलं' आणि पुढे म्हणाला, 'दोन महिन्याच्या बाळाला 16 कोटींचं इंजेक्शन हवंय, 2 महिन्याच्या बाळाला!'
त्यानंतर रैना ऑडियन्समध्ये उपस्थित असलेल्या एका महिलाला विचारतो की 'मॅम तुम्ही सांगा, जर तुम्ही ती आई असता आणि तुमच्या बॅंकमध्ये 16 कोटी आले असते. त्यात 2 महिन्याचं बाळ, एकदा तर नवऱ्याकडे बघून बोलली असती उम्म्म्म्म... इन्फेक्शन वाढतंय. कारण ते इंजेक्श घेतल्यानंतर ते बाळ वाचणार आहे की नाही, याची काही शक्यता नाही. ते इंजेक्शन घेतल्यानंतर त्या बाळाचा जीव देखील जाऊ शकतो. जर इंजेक्शन घेतल्यानंतर ते बाळ मेलं तर त्यानं किती मोठं नुकसान होईल. त्यातही 16 कोटींचं इजेक्शन घेतल्यानंतर तर बाळ वाचलं आणि मोठं होऊन जर म्हणाला की मी मला कवी व्हायचंय. मी तर बुटांनी मारेन. नाही, नाही, नाही... आयुष्यात काहीतरी कर... 16 कोटी दिलेत.'
हेही वाचा : Chhaava साठी Sunday ठरला ब्लॉकबस्टर! 3 दिवसात 100 Cr क्लबमध्ये; बजेटही केलं वसूल
या व्हिडीओवर बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरीनं देखील त्याची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, कदाचित स्टॅंडअप कॉमेडियनला माइक देण्याआधी त्याला मानसिक चाचण्या अनिवार्य असाव्यात!' एका नेटकऱ्यानं कमेंट केली की, 'तो जितका मानसिकरित्या आजारी आहे, त्याच्यासाठी टाळ्या वाजवणारेही तितकेच मानसिकरित्या आजारी आहेत.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'भयानक आणि आजारी!!' आणि प्रेक्षकही हसतात!!”
समय रैनाने महाराष्ट्र सायबर सेलला सांगितले होते की तो सध्या अमेरिकेत एक शो करत आहे. त्यामुळे तो भारतात येऊन त्याचे म्हणणे नोंदवू शकत नाही. समय रैनाने सायबर विभागाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याचे म्हणणे नोंदवण्यास सांगितले होते, जे महाराष्ट्र सायबर विभागाने नाकारले आहे. आता समय रैनाला मुंबईत येऊन त्याचे म्हणणे नोंदवावे लागेल. जर समय रैना वेळेवर हजर झाला नाही तर त्याच्या नावाने दुसरे वॉरंट जारी केले जाईल, जर तो तरीही हजर झाला नाही तर त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले जाईल. महाराष्ट्र सायबर विभागाने समय रैनाला 18 फेब्रुवारी रोजी मुंबईत येऊन त्याचे म्हणणे नोंदवण्यास सांगितले आहे.