Nitin Desai ND Studio and Brad Pitt connection : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी एन.डी.स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यांच्या निधनानं सगळ्यांना मोठा धक्का बसला असून हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी हादरून गेली आहे. नितीन यांनी वयाच्या 58 व्या वर्षी त्यांचं आयुष्य संपवलं आहे. नितिन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते महाराष्ट्रातील सर्व राजकारण्यांपर्यंत नितिन देसाई यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या निधनाचे कारण समोर आले नसून त्यात पोलिस तपास घेत आहेत. दरम्यान, नितीन देसाई यांनी या एन.डी.स्टुडिओला कसे उभारले त्या मागचे कारण हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पीट आहे.
नितीन देसाई यांना अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक ऑलिव्हर स्टोननं त्यांना कामासाठी एक ऑफर दिली होती. त्यांच्यासोबत 9 दिवस, लडाख, उदयपुर, महाराष्ट्र सारख्या शहरांमध्ये नितीन फिरले होते. त्यांना ब्रॅड पीटसोबत, एलेक्जेंडर-द ग्रेट हा चित्रपट बनवायचा होता. चित्रपटातील काही भाग हा भारतात शूट करायचा होता. आम्ही सगळ्या गोष्टींवर चर्चा केली, पण जेव्हा मी त्यांनी एका स्टुडिओमध्ये घेऊन गेलो तेव्हा ते थोडे नाराज झाले. त्यांच्या या चित्रपटाचं बजेट हे 650 कोटींचं होतं. त्यासाठी त्यांना जे इंफ्रास्ट्रक्चर हवं होतं ते मिळत नव्हतं. तेव्हा मला वाटलं की असा स्टुडिओ पाहिजे जो पाहून इंटरनॅशनल लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या सगळ्या पूर्ण होतील. त्यासाठी खूप ठिकाणी गेल्यानंतर मला कर्जतमध्ये ND स्टुडिओ बवण्याची संधी मिळाली.
नितीन देसाई यांच्या या स्टुडिओमध्ये सगळ्यात पहिलं शूटिंग हे आमिर खानच्या 'मंगल पांडे-द राइजिंग' या चित्रपटाचं झालं होतं. त्यानंतर मधुर भंडारकरच्या 'ट्रॅफिक सिग्नल' आणि आशुतोष गोवारिकर यांचा 'जोधा अकबर' शूट झाला होता. या चित्रपटासाठी हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय हे दोघे ही सहा महिने सेटवर होते.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या जवळपास 67 कार्यक्रमांसाठी त्यांनी काम केलं होतं. स्टॅच्यू ऑफ यूनिटीच्या इमॉग्रेशन प्रोग्रामसाठी देखील त्यांनी काम केलं होतं. समुद्रात ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार आहेत. त्या ठिकाणी ते नरेंद्र मोदी यांना घेऊन गेले होते.
नितीन देसाई यांच्या कामाविषयी बोलायचं झालं तर त्यांच्या 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ आणि 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देवदास’ या दोन्ही चित्रपटांसाठी त्यांना उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.