Chhava: हम शोर नहि करते सीधा शिकार करते है..अशा एकापेक्षा एक जबरदस्त डॉयलॉगमुळे छावा चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. छत्रपती संभाजी महाराजांची कारकिर्द छावाच्या रुपाने रूपेरी पडद्यावर मांडण्यात आली आहे. अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना यांच्या या चित्रपटाने समीक्षकांची वाहवा मिळवत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. फक्त 3 दिवासात या चित्रपटाने 121 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. मात्र, चित्रपटाचे डायलॉग लिहीणाऱ्या इरशाद कामिल यांनी एक रुपयाही मानधन घेतलेले नाही. यामागचे कारण जाणून थक्क व्हाल.
छावा चित्रपटाची गाणी लिहिणारे गीतकार इर्शाद कामिल यांनीच चित्रपटातील काव्यात्मक संवादही लिहिले आहेत. मात्र, यासाठी एक रुपया देखील मानधन घेतले नसल्याचे इरशाद कामिल यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले. तसेच मानधन का घेतले नाही याचे कारण देखील इरशाद कामिल यांनी सांगितले आहे.
लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा' हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. अभिनेता विकी कौशलने सिनेमात संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास जीवंत केल्याचं म्हणत प्रेक्षकांनी कौतुक केलंय. तर, राणी येसूबाईच्या भूमिकेतील रश्मिका मंदानानेही प्रेक्षकांची वाहवा मिळवली. व्यतिरिक्त, चित्रपटात आशुतोष राणा, प्रदीप राम सिंग रावत, संतोष जुवेकर, नील भूपालम, आलोक नाथ, किरण कर्माकर आणि विनीत कुमार सिंग सारखे अनुभवी कलाकार आहेत.
छत्रपती संभाजी महाराज म्हणजे स्वराज्याचा छावा, स्वराज्यासाठी बलिदान देणारा असामान्य योद्धा, धैर्य, पराक्रम, असमान्य शौर्य, धर्माभिमान, व्यासंगी असलेल्या संभाजी महाराजांनी अनेक क्षेत्रात निर्विवाद वर्चस्व गाजवलं हाच इतिहास छावा चित्रपटात दाखवण्यात आला आहे. जबरदस्त संवादामुळे हा चित्रपट पाहताना आणि संवाद ऐकताना अंगावर शहारे येतात.
छत्रपती संभाजी महाराज हे माझा आदर्श आहेत. चित्रपटासाठी संवाद लिहीताना मला छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहास अगदी जवळून अनुभवायला मिळाला आहे. ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी संवाद लिहण्यासाठी एक रुपयाचे मानधन घेतले नसल्याचे इरशाद कामिल यांनी सांगितले.