मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता इरफान खानच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे. लंडनमध्ये कॅन्सरची ट्रिटमेंट घेणारा इरफान खान मेडिकल ट्रीटमेंट घेतल्यानंतर भारतात परत येणार आहे. एका वेबसाइटने दिलेल्या रिपोर्टनुसार अभिनेता इरफान खान 1 किंवा 2 दिवसात मुंबईत परत येणार आहे .
इरफान खान भारतात परत येणार असून हिंदी मिडीयम या सिनेमाच्या दुसऱ्या भागाचं शुटिंग करत आहे. इरफान खान 7 महिन्यानंतर पुन्हा घरी येणार आहेत. चाहते आता खूप खूष आहेत. डिसेंबरच्या पहिल्या महिन्यात या सिनेमाचं शुटिंग सुरू होणार आहे.
भारतीय शिक्षण संस्थेवर आधारित हा सिनेमा तयार केला जात आहे. इरफान खानच्या या सिनेमात पाकिस्तानी अभिनेता सबा कमरसोबत दिसणार आहे.
इरफान खानने या वर्षी मार्च महिन्यात अगदी धक्कादायक खुलासा केला होता. या खुलास्यामध्ये त्याने आपल्या आजाराबाबत माहिती दिली होती. यामुळे अनेक चाहते देखील चिंतेत होते.