जगातील सर्वात महागडी सॅंडल 123 कोटी रुपये

1.7 कोटी डॉलरची ही सॅंडल संयुक्त अरब अमीरात ( यूएई) मध्ये बनली आहे.

Updated: Sep 28, 2018, 02:31 PM IST
जगातील सर्वात महागडी सॅंडल 123 कोटी रुपये title=

मुंबई : महागडी कार, लक्झरी घर आणि आरामदायी शूज ही प्रत्येकाचीच आवड असते. यासाठी बरेचजण हवे तितके पैसे खर्च करतात. पण 123 कोटी रुपयांची सॅंडल घेतली असं कोणी सांगितलं तर काय म्हणालं? एवढी महागडी सॅंडल कोणासाठी बनली आहे आणि नक्की कोण वापरणार याबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. 1.7 कोटी डॉलरची ही सॅंडल संयुक्त अरब अमीरात ( यूएई) मध्ये बनलीयं. ही सॅंडल बनविण्यासाठी साधारण 9 महिन्यांचा वेळ लागलायं.

jadadubai या अकाऊंटवरून या सॅंडलचा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्याला अनेक लाईक्स मिळत आहेत. अनेकजण उत्सुकतेपोटी हा व्हिडिओ पाहत असून त्यावर आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Diamonds, gold. The Passion Diamond Shoes.

A post shared by JADA DUBAI (@jadadubai) on

कोटींची व्हिस्की  

केवळ सॅंडलच नव्हे तर अशा अनेक वस्तू आहेत ज्याच्या किंमतीच विचारदेखील आपण करु शकत नाही. आता व्हिस्कीचाच विषय घ्याना. साधारण तिची किंमती किती असू शकते ?. लाख, दीड लाख ?.. नाही. काही दिवसांपूर्वीच हॉंगकॉंगमध्ये मॅकेलन व्हिस्की लिलावासाठी ठेवण्यात आली होती. माध्यमात आलेल्या वृत्तानुसार या व्हिस्कीची किंमत 5कोटी रुपये होती. 

 याआधी हॉंगकॉंगमध्ये मॅकालन एम इम्पीरियल ब्रॅण्ड ठेवला होता. याच्या 6 लीटर माल्ट व्हिस्कीची बॉटल एकाने 6 लाख 28 हजार 205 डॉलर्सना खरेदी केली. 2010 मध्ये मॅकालन एम इम्पीरियल ब्राण्ड ही माल्ट व्हिस्कीचा लिलाव न्यूयॉर्कमध्ये झाला. याच्या एका बॉटलची किंमत 4 लाख 60 हजार डॉलर इतकी ठरली.