Viral Video : पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आतापर्यंत अनेक जीव अस्तित्वात आले, नष्टही झाले. अनेक अन्नसाखळ्या या पृथ्वीवर अस्तित्वात होत्या. काळानुरूप अनेक बदल झाले आणि या अन्नसाखऱ्यांचाही ऱ्हास होत गेला. अशाच या अनोख्या विश्वास नुकताच एक असा सागरी जीव सर्वांसमोर आला आहे की पाहणारेसुद्धा यामुळं हैराण होत आहेत.
NGO Condrik Tenerife नं नुकताच आफ्रिकेतील कॅनरी आयलंड या किनाऱ्यानजीक एक असा जीव चित्रीत केला जो सहसा कुठंही पाहायला मिळत नाही. समुद्राच्या खोलवर असणारा seadevil anglerfish इतक्या जवळून आणि तोसुद्धा किनाऱ्याच्या इतक्या नजीक पाहण्याची ही पहिलीच वेळ.
'न्यू यॉर्क पोस्ट'च्या वृत्तानुसार सीडेव्हिल हा मासा सहसा समुद्राच्या पृष्ठापासून 650 ते 6500 फूट खोलवर आढळतो. तांत्रिक भाषेत या क्षेत्राला Bathypelagic Zone किंवा मिडनाईट झोन असं म्हटलं जातं. NOAA च्या माहितीनुसार या क्षेत्रामधील तापमान साधारण 39°F (4° अंश सेल्सिअस) इतकं असतं. समुद्रातील इतक्या खोलवरच्या क्षेत्रामध्ये सूर्यप्रकाशाचा अभाव असण्यासोबतच पाण्याचा दाब 5850 पाऊंड प्रति इंच इतका असतो.
First-ever video footage of a rare deep-sea Black Devil fish in shallow waters near Tenerife.
[Condrik_Tenerife]pic.twitter.com/Jf3wl8HdfX
— Massimo (@Rainmaker1973) February 7, 2025
संशोधकांनी या माशाविषयी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार समुद्री दीवांची जी प्रजात अतिशय दुर्मिळ असून, समुद्राच्या जवळपास तळाशी असणारी ही अतिशय जुनी प्रजातही असल्याचं म्हटलं जातं. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये हा मासा पाहायला मिळत आहे. जिथं समुद्राच्या तळाशी निळ्याशार पाण्यामध्ये काळसर रंगाचा आणि अतिशय विचित्र रचना असणारा एक मासा पाहायला मिळत आहे. या माशाचे तीक्ष्ण दात पाहताक्षणी धडकी भरवत आहेत. तुमच्या सोशल मीडिया फीडमध्ये आला का हा व्हिडीओ?