कोरोना व्हावा अशी 'या' महिलेची इच्छा; विचित्र इच्छेने सर्वजण चक्रावले!

कोरोना व्हावा यासाठी ही महिला मुद्दाम प्रयत्न करतेय.

Updated: Jan 12, 2022, 02:15 PM IST
कोरोना व्हावा अशी 'या' महिलेची इच्छा; विचित्र इच्छेने सर्वजण चक्रावले! title=

सिडनी : कोरोनाने नागरिकांच्या मनात दहशत पसरवली असून आपल्याला कोरोना होऊ असंच प्रत्येकाच्या मनात आहे. मात्र याला ऑस्ट्रेलियातील एक महिला अपवाद आहे. ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या या महिलेला स्वतःला लग्नाअगोदर कोरोना व्हावा अशी इच्छा आहे. इतकंच नव्हे तर कोरोना व्हावा यासाठी ती जाणूनबूझून प्रयत्न करतेय.

Video शेयर करत सांगितली इच्छा

एका वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियात राहणारी मॅडी स्मार्ट हिचं काही दिवसात लग्न आहे. दरम्यान लग्नाच्या अगोदर आपल्याला कोरोना व्हावा असं तिला वाटतं. यासाठी ती क्लबमध्ये जाऊन लोकांना मिठी मारतेय तसंच त्यांच्यासोबत ड्रिंक्सही शेअर करतेय.

मॅडीने टिकटॉकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीयोमध्ये ती मेलबर्नमधील एका नाईट क्लबमध्ये मुला-मुलींना मिठी मारताना दिसतेय. मिठी मारल्यानंतर कोरोनाची लागण होईल असा तिचा प्रयत्न आहे.

मॅडीचा असं वाटतं की, लग्नाआधी एकदा तिला कोरोनाचा संसर्ग झाला तर निदान लग्नाच्या वेळी तरी तिला पुन्हा संसर्ग होणार नाही. परिणामी कोरोनामुळे तिचं लग्न थांबणार नाही. 

टिकटॉवर शेअर केलेल्या 15 सेकंदांच्या व्हिडीयोला 'Catch COVID Not Feeling' असं नाव दिलं आहे. या महिलेने तिच्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'लग्न 6 आठवड्यांत आहे आणि अजूनही कोविड झालेला नाही.' 

मॅडी स्मार्टने व्हिक्टोरिया, मेलबर्नमधून व्हिडिओ पोस्ट केलाय. स्मार्टच्या व्हिडियोला लोकांनी प्रतिसाद दिला आहे. काही लोकं तिचं कौतुक करतायत  तर काहींचं म्हणणं आहे की, या महिलेने असा मूर्खपणा करण्यापूर्वी किमान आरोग्य कर्मचाऱ्यांचा विचार करावा.