ड्रायव्हरला हार्ट अटॅक आला अन् 13 वर्षाच्या मुलाने स्टेअरिंग हाती घेतलं... पाहा अंगावर काटा आणणारा Video

Viral Video : हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अवघ्या 13 वर्षाच्या मुलाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने अनेक विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहेत. अनेकांनी या मुलाच्या पालकांना त्याचा अभिमान वाटत असेल असे म्हणत त्याचे जोरदार कौतुक केले आहे

Updated: Mar 24, 2023, 04:54 PM IST
ड्रायव्हरला हार्ट अटॅक आला अन् 13 वर्षाच्या मुलाने स्टेअरिंग हाती घेतलं... पाहा अंगावर काटा आणणारा Video title=

Viral Video : सध्या आपण अशा वातावरणात जगतोय जिथे रोज आपल्या आजूबाजूच्या नकारात्मक गोष्टींचा आपल्यावर भडीमार केला जातोय. कळत नकळत या नकारात्मक गोष्टी आपल्यावर मोठा परिणाम करुन जात आहेत. मात्र काही अशाही गोष्टी ज्या आपल्याला नक्कीच प्रेरणा देऊन जातील. यामध्ये कोणत्या वयाच्या व्यक्तीने ती गोष्ट केली आहे हे महत्त्वाचे नाही तर त्याचे काम महत्त्वाचे आहे. कारण ती गोष्ट तुम्हाला सुखावून जाते आणि तुम्ही काहीतरी प्रेरणादायी मिळवलं आहे अशी भावना तुमच्या मनात निर्माण होते. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट घडलीय ज्यामध्ये एका 13 वर्षाच्या मुलाने त्याच्या मित्रांचे प्राण वाचवले आहेत.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतो आहे. या धक्कादायक व्हिडीओमध्ये 13 वर्षाच्या मुलाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने त्याच्या इतर मित्रांचे प्राण वाचले आहेत. स्कूल बसच्या चालकाला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्यानंतर या धाडसी विद्यार्थ्याने कसलाही विचार न करता बसचे स्टेअरिंग हाती घेतले आणि बस मधल्या इतर विद्यार्थ्यांचेदेखील प्राण वाचवले. या अविश्वसनीय घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायर होत आहे.

ग्रेट व्हिडीओ नावाच्या ट्विटर हॅंडलवरुन हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. या ट्विटमध्ये स्कूल बस ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर 13 वर्षांचा मुलाने स्टेअरिंग हातात घेतले आणि सर्व मुलांचे प्राण वाचवले, असे म्हटले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये स्कूल बस चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. बस चालकाला हार्ट अटॅक आल्याने तो बेशुद्धच पडला आणि बसवरील त्याचा ताबा सुटला.

यानंतर बसला मोठा अपघात होईल या भीतीने पाहून बसलेल्या एका विद्यार्थ्यांने धाडस दाखवत बसच स्टेअरींग हाती घेतले. त्याने बसचे स्टेअरींग सांभाळल्याने मोठा अपघात टळला. त्यानंतर त्याने बस चालकाला CPR (सीपीआर) देण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना बसमध्ये लावलेल्या कॅमेरात कैद झाली होती.

हा व्हिडीओ 2013 मध्ये YouTube वर पोस्ट करण्यात आला होता. मात्र अवघ्या 13 वर्षांच्या मुलाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला आहे आणि त्यामुळे हा व्हिडीओ आजही व्हायरल होत आहे. त्यामुळे या मुलाच्या कृतीने जगभरातील प्रेक्षकांवर कायमची छाप सोडल्याचे स्पष्ट झाले आहे.

या व्हिडीओतील मुलाचे लोकांनी मोठ्या प्रमाणात कौतुक केले आहे. सोशल मीडियावरच्या युजर्सनी त्याच्या पालकांना त्याचा अभिमान वाटत असेल असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, हा मुलगा खरा हिरो आहे, त्याने पहिल्यांदा परिस्थिती पाहिली आणि न घाबरता प्रतिक्रिया दिली, असे म्हटले आहे.