Francisco World Record : या जगात अनेक लोक त्यांच्या वेगवेगळ्या कलांनी ओळख निर्माण करतात. काही लोक तर विचित्र गोष्टी करुन ही आपली ओळख तयार करतात. काही लोक इतक्या विचित्र गोष्टी करतात की जे बघतात आणि ऐकतात त्यांचाही डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास बसत नाही. पण तुम्हाला माहित आहे का, या विचित्र गोष्टी करुन लोक नवीन विश्वविक्रमही घडवतात. काही गोष्टींची अपेक्षा करणे ही खूप कठीण असते तरी लोक त्यात विक्रम घडवतात. (person broke a whole can of cold drink and set a world record nz)
काहीजण त्यांच्या लहान किंवा उंच असल्याने वेगवेगळे रेकॉर्ड तोडताना पाहायला मिळतात. अनेकदा त्यांच्यात असलेल्या वेगळेपणामुळे का होईना लोकांना विश्वविक्रम करताना पाहायला मिळते. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात रुंद तोंड असलेल्या व्यक्तीबद्दल सांगणार आहोत.
जगात असे लोक देखील आहेत की त्यांच्या तोडांची रुदी ही सर्व सामान्यांपेक्षा जास्त आहे. तुम्हाला माहितेय का, एका व्यक्तीने चक्क तोडांत कोल्ड्रिंकचा संपूर्ण कॅन ठेवून स्वत:ची नोंद घ्यायला जगाला भाग पाडले. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे अगदी खरे आहे.
जगातील सर्वात रुंद तोंड असलेल्या या माणसाचे नाव आहे फ्रान्सिस्को डोमिंगो जोआकिम (Francisco Domingo Joaquim). फ्रान्सिस्को हा आफ्रिकेत राहून असून अंगोलाचा रहिवासी आहे. लोक फ्रान्सिस्कोला त्याच्या चिक्विनहो (Chiquinho) नावाने देखील ओळखतात. त्याच्या तोंडाच्या रुंदीमुळे तो जगभर प्रसिद्ध आहे. लोक त्याला जगातील सर्वात रुंद तोंड असलेला माणूस म्हणून ओळखतात. यासाठी फ्रान्सिस्कोच्या नावाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही (Guinness World Records) झाली आहे
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, फ्रान्सिस्कोचे तोंड 17 सेमी (6.69 इंच) पर्यंत उघडते. त्याच्या तोंडाची रुंदी इतकी मोठी आहे की तो कोल्ड्रिंकचा संपूर्ण कॅन तोंडात सहज ठेवू शकतो. फ्रान्सिस्कोचे हे वैशिष्ट्य लोकांना आश्चर्यचकित करते. फ्रान्सिस्कोने 18 मार्च 2010 रोजी रोम, इटली येथे हा विश्वविक्रम केला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्याचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये फ्रान्सिस्को आपले मोठे तोंड उघडताना दिसत आहे. ज्यामध्ये तो कोल्ड्रिंकचा कॅन तोंडात ठेवून दाखवतो.