Pakistan Gold Reserves : पाकिस्तानमध्ये सोन्याची मोठी खाण सापडली आहे. या खाणीत जवळपास 17,000,000,000 किंमतीचे सोने सापडले आहे. सोन्याचं मोठ भंडार सापडल्यामुळे कंगाल झालेला पाकिस्तान देश रातोरात मालामाल झाला आहे. पाकिस्तानत सापडलेला हा सोन्याचा खजिना पाहून सर्वच देश अचंबित झाले आहेत.
पाकिस्तान देश सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सरकार कर्ज काढून देशाचा कारभार चालवत आहेत. पाकिस्तानवर कर्जाचा मोठा डोंगर झाला आहे. अशात पाकिस्तानला लॉटरी लागली आहे. पाकिस्तानला सिंधू नदीत सोन्याचा भांडार सापडले आहे. माजी खाण मंत्री इब्राहिम हसन यांनी पाकिस्तानच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचा हवाला देत देशात सोन्याचा मोठा साठा सापडल्याचा दावा केला. पंजाब प्रांतात सोन्याचा एवढा मोठा साठा सापडला आहे की, देशाचे आर्थिक संकट क्षणार्धात संपुष्टात येईल असं हसन यांचे म्हणणे आहे. अवैध उत्खनन रोखण्यासाठी सरकारने निर्बंध लादल्याचेही बोलले जात आहे. पण आफ्रिकन देशांप्रमाणे नद्यांमध्ये सोन्याचे साठे सापडल्याने पाकिस्तानला निश्चितच दिलासा मिळाला आहे.
सिंधू नदी ही जगातील सर्वात जुनी आणि सर्वात लांब नद्यांपैकी एक आहे. या नदीने प्राचीन संस्कृतीच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अहवालानुसार, प्लेसर गोल्ड डिपॉझिशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नैसर्गिक प्रक्रियेमुळे नदीच्या काही भागात मोठ्या प्रमाणात सोने जमा झाले आहे.
अटॉक जिल्ह्याच्या 32 किलोमीटर परिसरात सोन्याचा साठा दडलेला आहे. संपूर्ण जिल्ह्याचा विचार करता, परिसरात असलेल्या सध्या सोन्याची किंमत जवळपास 600 अब्ज पाकिस्तानी रुपये असू शकते असा अंदाज आहे. येथील रेको डिक खाण सोने आणि तांब्याने भरलेली आहे. बलुचिस्तानच्या चगई जिल्ह्यात असलेल्या या खाणीत लाखो टन सोन्याचा साठा असल्याचे सांगण्यात येत आहे. बलुचिस्तानच्या या खाणीची गणना जगातील काही मोठ्या खाणींमध्ये केली जाते. जिथे सोन्याचे आणि तांब्याचे उत्खनन होते. कदाचित याच कारणामुळे चीन अनेक दशकांपासून आपले सैन्य आणि संघ घेऊन येथे बसून आहे. चीनची एक कंपनी येथे खाणकाम करत आहे.