Rajasthan News: राजस्थान की राजधानी जयपुरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बस कंडक्टरने फक्त 10 रुपयांसाठी मारहाण केली. मात्र, हा वृद्ध माजी IAS ऑफिसर निघाला. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर मारहाण करणाऱ्या कंडक्टरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
जयपुर सिटी ट्रान्सपोर्टच्या बसने प्रवास करताना एका माजी IAS ऑफिसरला मारहाण झाली आहे. आरएल मीणा असे मारहाण झालेल्या एका माजी IAS अधिकाऱ्याचे नाव आहे. आरएल मीणा हे जयपुर सिटी ट्रान्सपोर्टच्या बसने प्रवास करत होते. यावेळी आरएल मीणा यांना इच्छित बस स्टॉपवर उतरता आले नाही. ते एक स्टॉप पुढे गेले. यामुळे कंडक्टरने त्यांना एका स्टॉपचे जादा तिकीट म्हणून 10 रुपये मागितले. यावरुन आरएल मीणा आणि कंडक्टर यांच्यात वाद झाला.
बस स्टॉपवर थांबवली नाही यामुळे मला उतरता आले नाही असे आरएल मीणा यांनी कंडक्टरला सांगितले. मात्र, कंडक्टरने आरएल मीणा यांच्याशी वाद घालत त्यांना मारहाण केली. बसमधील प्रवाशांनी याचा व्हिडिओ बनवला. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
या घटनेनंतर आरएल मीणा यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. जयपुर सिटी ट्रान्सपोर्ट प्रशासनाने याची गांभिर्याने दखल घेत आरएल मीणा यांना मारहाण करणाऱ्या कंडक्टरवर तातडीने निलंबनाची कारवाई केली आहे. घनश्याम शर्मा असे या प्रकरणी निलंबीत करण्यात आलेल्या कंडक्टरचे नाव आहे.