सर्व काही सोडून बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री बनली बौद्ध भिक्षु; ‘मिस इंडिया’ स्पर्धेत सुष्मिता-ऐश्वर्याला दिली होती टक्कर

Barkha Madan : ‘मिस इंडिया’ स्पर्धेत सुष्मिता-ऐश्वर्याला टक्कर देणारी बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री बनली बौद्ध भिक्षु बनली आहे. जाणून घेऊया ही अभिनेत्री कोण आहे.   

वनिता कांबळे | Updated: Jan 13, 2025, 09:47 PM IST
 सर्व काही सोडून बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री बनली बौद्ध भिक्षु; ‘मिस इंडिया’ स्पर्धेत सुष्मिता-ऐश्वर्याला दिली होती टक्कर  title=

Barkha Madan Buddhist Monk : सर्व काही सोडून बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री बनली बौद्ध भिक्षु बनली आहे. अक्षय कुमारच्या चित्रपटातून या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. इतकचं नाही तर 1994 च्या मिस इंडिया स्पर्धेतही या अभिनेत्रीने भाग घेतला होता. यावेळी तिनं ब्युटी क्वीन ऐश्वर्या राय आणि सुष्मिता सेन यांना टक्कर दिली होती. यानंतर या अभिनेत्रीने मिस टुरिझम इंडियाचा किताबही जिंकला होता. जाणून घेऊया अध्यात्मचा मार्ग स्विकारणारी अभिनेत्री कोण आहे.

बरखा मदन (Barkha Madan) असे या अभिनेत्रीचे नाव आहे.  बरखा मदन ही अध्यात्मचा मार्ग स्विकारणारी पहिली अभिनेत्री नाही. यापूर्वी  ‘दंगल गर्ल’ झायरा वसीमपासून सना खानपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी धर्म किंवा अध्यात्मचा मार्ग स्वीकारण्यासाठी बॉलिवूड इंडस्ट्री सोडली आहे. बरखा मदन देखील सर्व काही सोडून बौद्ध भिक्षु बनली आहे. 

1996 मध्ये बरखानं अक्षय कुमारबरोबर 'खिलाडियों का खिलाडी' या हिट अॅक्शन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट खूप यशस्वी झाला होता. यानंतर 2023 प्रदर्शित झालेल्या राम गोपाल वर्माच्या सुपरनॅचरल थ्रिलर 'भूत' या चित्रपटानं तिला चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली. तिच्या भूमिकेचं समीक्षकांनीही भरपूर कौतुक केलं होतं. या चित्रपटात उर्मिला मातोंडकर, नाना पाटेकर, रेखा, अजय देवगण या सारखे दिग्गज कलाकार होते. मात्र, चित्रपटात तिने आपली वेगळी छाप पाडली. मॉडेल आणि बॉलिवूडमध्ये आपले करिकर वेगळ्या उंचीवर असताना 2012 मध्ये बरखा मदन हिने स्वतःचं जीवन बदलून टाकणारा निर्णय घेतला. 

बरखा मदान (Barkha Madan) आता ग्यालटेन सॅमटेन म्हणून ओळखली जाते. दलाई लामा यांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या बरखाने 2012 मध्ये बौद्ध धर्माची दिक्षा घेतली.  तिनं स्वतःला दलाई लामांच्या शिकवणींमध्ये समर्पित केले आहे. पर्वतीय मठांमध्ये ती राहते. सोशल मिडियावर ती फोटो शेअर करत असते. यात तिचा अध्यात्मिक जीवनाची झलक पहायला मिळते.