France Prime Minister : मोठ्या राजकीय क्लेशानंतर फ्रान्सच्या राजकारणाला (France Politics) मोठं वळण लागलं आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी 34 वर्षांच्या गॅब्रिएल अटल (Gabriel Attal) यांची फ्रान्सच्या पंतप्रधानपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता गॅब्रिएल अटल फ्रान्सच्या (France PM) इतिहासातील सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान (First Gay prime minister) बनले आहेत. 62 वर्षीय एलिझाबेथ बॉर्न यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर मॅक्रॉन यांनी हा निर्णय घेतला. एलिझाबेथ बॉर्न (PM Elisabeth Borne) गेल्या दोन वर्षापूर्वी या पदावर होत्या. अशातच आता मोठी उलटापालट झाल्याचं पहायला मिळतंय. (France first Gay and Youngest PM Gabriel Attal)
फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान गॅब्रिएल अटल यांचा जन्म मार्च 1989 मध्ये झाला आहे. त्यांचे वडील ज्यू वंशाचे आहेत, तर आईचे पूर्वज ग्रीक-रशियन होते. गॅब्रिएल आतापर्यंत देशाचे शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत होते. गॅब्रिएल अटल यांनी सार्वजनिकरित्या आपण समलिंगी असल्याचं मान्य केलं आहे. गॅब्रिएल यांची सभागृहात बोलका नेता म्हणून ओळख आहे. पंतप्रधान होण्यापूर्वी गॅब्रिएल शिक्षण आणि युवा व्यवहार मंत्री होते. त्यावेळी त्यांच्या कामाच्या शैलीमुळे ते चांगलेच चर्चेत आले होते.
34-year-old Gabriel Attal becomes France's youngest PM pic.twitter.com/1CnRhywK0Q
— Rishi Bagree (@rishibagree) January 9, 2024
इमिग्रेशनच्या मुद्द्यावरून वाढत्या राजकीय तणावामुळे एलिझाबेथ यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. या वर्षाच्या अखेरीस फ्रान्समध्ये निवडणुका होणार आहेत. अशातच युरोपियन युनियन निवडणुकीपूर्वी मॅक्रॉन आपल्या संघात मोठे बदल केले गेले आहेत. नुकत्याच झालेल्या ओपिनियन पोलमध्ये गॅब्रिएल हे देशातील सर्वात लोकप्रिय नेता म्हणून समोर आले आहेत. त्यामुळे आता फ्रान्समधील कुस बदलली जातीये का? असा सवाल विचारला जातोय.
भारत आणि फ्रान्स यांचे परराष्ट्रीय संबंध (India - France)
दरम्यान, मागच्या काही वर्षांपासून भारताचा फ्रान्सशी असेलला व्यापार वर्षाला 10 ते 12 अब्ज डॉलर्स इतकाच आहे. त्या तुलनेत बांगलादेश, थायलंड, मलेशिया आणि व्हिएतनाम या राष्ट्रांशी फ्रान्सपेक्षाही जास्त व्यापार होतो. मागच्या 25 वर्षांत दोन्हीही देशांचे संबंध अधिक सदृढ होण्यासाठी भारताचे तीन पंतप्रधान आणि फ्रान्सच्या चार राष्ट्राध्यक्षांनी भक्कम असा पाया रचला असून, चांगले योगदान दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल कराराला अंतिम रूप देण्यात आणि इंडो-पॅसिफिक धोरण रेटून नेण्यात ऐतिहासिक अशी भूमिका बजावली आहे.