Crocodile Jaw Got Stuck: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (viral video) होत असतात. काही व्हिडिओ हे खुप मनोरंजक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत गारठवणाऱ्या थंडीत एका मगरीचा जबडा बर्फात (Crocodile Jaw) गोठल्याची घटना घडलीय. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगलीय.
व्हिडिओत तुम्ही पाहू शकता गारठवणारी थंडी पडली आहे.या परिसरात इतकी थंडी पडलीय की तलाव बर्फाने गोठली आहेत. या तलावातील जीवांची यामुळे मोठी पंचाईत झाली होती. त्यात एका मगरीचा तलावात जबडाच (Crocodile Jaw) अटकला होता. तलावाच्या आत तोंड वर करून ही मगर झोपली होती. त्यावेळस इतकी थंडी पडली की तिचा जबडाच बर्फात गोठला होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल (viral video) होत आहे.
व्हिडिओत तुम्ही पुढे पाहू शकता मगरीला वाचवायचा प्रयत्नही झाला. मगरीचा जबडा बर्फात (Crocodile Jaw) अडकल्याचे पाहून एका तरूणाने तिला वाचवायचे प्रयत्न केले. त्याने मगरीच्या जबड्याजवळ हातोडीने वार केले, जेणेकरून तो बर्फ तुटेल आण तिला मोकळीक मिळेल. त्याने चारही बाजूने हल्ला करत तिचा जबडा मोकळा करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळानंतर मगरीचा जबडा (Crocodile Jaw) मोकळा झाला आणि तीची या बर्फातून सुटका झाली.
तंसू येजेनने हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये, जॉर्ज हॉवर्ड नावाच्या व्यक्तीने व्हॉईस-ओव्हर दिला आहे. या पोस्टमध्ये मगरींबद्दल काही माहिती देखील शेअर करण्यात आली होती. "मगर गोठलेल्या दलदलीत श्वास घेण्यासाठी बर्फात नाक चिकटवून जगतात. मगरी त्यांचे चयापचय बंद करतात, आणि त्यांना खाण्याची गरज नसते, त्यांच्या हृदयाचे ठोके मंदावतात, त्यांची पचनसंस्था मंदावते आणि ते बसून उष्णतेची वाट पाहत असतात, अशी माहिती देण्यात आली आहे.
Alligators survive in frozen swamps by sticking their noses through the ice to breathe. Reptiles shut down their metabolism, and they don't need to eat their heart rate slows down, their digestive system slows down, and they just sit and wait for the heat. pic.twitter.com/YAQiSwlOAc
— Tansu YEĞEN (@TansuYegen) December 16, 2022
दरम्यान सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे.