मुलांनी यासाठी मुलींच्या पर्सला अजिबात हात लावू नये

कोणत्याही ग्रुपमध्ये मुलं मुली एकत्र आले की, मुलींची बॅग ही कायम चर्चेचा विषय असतो. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 10, 2018, 06:21 PM IST
मुलांनी यासाठी मुलींच्या पर्सला अजिबात हात लावू नये  title=

मुंबई : कोणत्याही ग्रुपमध्ये मुलं मुली एकत्र आले की, मुलींची बॅग ही कायम चर्चेचा विषय असतो. 

मुलींच्या बॅगेत नेमकं काय असतं हे जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. कारण छोट्याशा बॅगेतही बऱ्याच गोष्टी स्त्रिया सांभाळून ठेवतात. तसेच अगदी एका छोट्याशा पिनपासून अगदी मोठ्या बॉटलपर्यंत साऱ्या गोष्टी या बॅगेत असतात. 

महत्वाचं म्हणजे मुली कायम आपली पर्स मुलांपासून दूर ठेवतात. अगदी लहान मुलांपासून पण मुली आपली बॅग लपवत असतात. मुली आपल्या पर्समध्ये काय ठेवत असतील असा प्रश्न अनेकांना पडत असेलही मात्र याचं उत्तर कुणालाही मिळालेलं नाहीये. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मुली आपल्या पर्समध्ये नेमकं ठेवतात तरी काय…

सॅनिट्री नॅपकिन 

मुलींच्या मासिक पाळीची तारिख जवळ आलेली असो वा नसो तरिही मुली आपल्या बॅगमध्ये सॅनिट्री नॅपकीन जरुर ठेवतात. सुरक्षितता म्हणून मुली आपल्या बॅगमध्ये सॅनिट्री नॅपकीन बाळगत असतात. आणि या महत्वाच्या कारणामुळे मुली आपली बॅग लपवत असतात. 

मेकअपचं सामन 

सर्वात महत्वाचं दुसरं कारण म्हणजे मेकअपचं सामान. मुलींच्या बॅगमध्ये मेकअपचं सामान आपल्याला जरुर पहायला मिळेल. जसेकी आरसा, कंगवा, मॉइसचुराइजर, काजळ, पावडर, लिप्स्टीक, सेफ्टी पिन, रबर बँड यासारख्या वस्तु नक्कीच पहायला मिळतील. मुलींना असं वाटतं की त्या मेकअपसाठी इतक्या वस्तुंचा वापर करतात याबाबत कुणालाही कळू नये.

टिश्यू पेपर (नॅपकिन) 

मुली साफसफाईच्या बाबतीत खुपच जास्त काळजी घेत असतात. यासाठीच मुली आपल्या बॅगमध्ये फेसवॉश, टिश्यू पेपर ठेवतात. आपला चेहरा धुळीने किंवा तेलामुळे खराब होऊ नये असे मुलींना नेहमी वाटत असते म्हणूनच प्रत्येकवेळी मुलींच्या बॅगेत या वस्तु पहायला मिळतील.

खाण्या-पिण्याचं सामान

मुलींना ज्यावेळी कंटाळा येतो त्यावेळी त्यानेहमी गाणी ऐकताना पहायला मिळतात किंवा काही खाताना दिसतात. यामुळे दिवसातील अधिकवेळ घराबाहेर राहणा-या मुली आपल्या बॅगमध्ये ड्रायफ्रूट्स, चिप्स, फळ ठेवतात. आणि मुलींच्या बॅगेतील खाण्याचं सामान हे कायम चर्चेचा विषय बनला आहे. 

सनग्लासेस

ऊन असो वा नसो मुलींना सनग्लासेस लावणं फार आवडतं म्हणूनच त्या आपल्या बॅगमध्ये एकतरी सनग्लास किंवा चश्मा ठेवतात. मुलींना वाटतं की सनग्लासचा वापर केल्यावर त्या अधिक सुंदर दिसतात.