Nitin Gadkari Diesel Vehicle: डिझेल वाहनांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना हे संकेत दिले आहेत. 63व्या सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स (SIAM) सोहण्यात बोलत असताना त्यांनी एक विधान केले आहे. गडकरींनी म्हटलं आहे की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे डीझेल गाड्यांवर अतिरिक्त 10 टक्के GST लावण्याची विनंती करण्याचा विचार मी करातोय. डिझेल वाहनांमुळे सर्वाधिक प्रदूषण होते आणि रस्त्यावर त्यांची संख्या कमीत कमी असावी अशी सरकारची इच्छा आहे. त्यांच्या या वक्तव्याने डिझेल गाड्या आता सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर जाणार का? अशी चर्चा रंगली आहे.
मी गेल्या 10-15 दिवसांपासून एक पत्र तयार करुन ठेवले आहे. ते पत्र आज संध्याकाळी निर्मला सीतारामन यांना पाठवणार आहे. यात, डीझेल वाहनांची आणि डीझेलवर चालणाऱ्या सर्व इंजिनावर अतिरिक्त 10 टक्के जीएसटी लावण्याचा प्रस्ताव आहे, असं नीतिन गडकरी यांनी म्हटलं आहे. डीझेलवर चालणाऱ्या गाड्याची संख्या कमी व्हावी यासाठी 10 टक्के जीएसटीचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. जेणेकरुन डीझेलच्या वाहनांचे निर्माण कमी होऊन प्रदूषण कमी होईल, असंही त्यांनी नमूद केले आहे.
ऑटो इंडस्ट्रीने स्वतःच डीझेलच्या वाहनांमुळं होणाऱ्या प्रदुषणावर पुढे येऊन तोडगा काढण्याची गरज आहे. अन्यथा सरकारकडे अशा परिस्थितीत दुसरा कोणताच उपाय नाहीये. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर डीझेल वाहन बंद करण्यात यावी नाहीतर आमच्याकडे टॅक्स वाढवण्याखेरीज दुसरा पर्याय नाहीये, असा इशारा नितीन गडकरींनी दिली आहे.
गेल्या 9 वर्षांत डीझेल कारची हिस्सेदारी 2014मध्ये 335ची घट होऊन 28 टक्के झाली आहे. त्यांनी डिझेल इंजिनमुळे पर्यावरणाची होणारी हानी सांगितली आणि प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जनाला आळा घालण्याबाबतही सांगितले. डिझेल वाहनांवरील कर वाढवून त्यांचे उत्पादन आणि विक्री कमी होईल, ज्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.