Facebook ला झालेय काय, का भडकले यूजर्स ?, हे आहे कारण..

Facebook newsfeed algorithm : सोशल मीडियावर फेसबुक विरोधात यूजर्सकडून हल्लाबोल करण्यात येत आहे.  

Updated: Aug 24, 2022, 03:03 PM IST
Facebook ला झालेय काय, का भडकले यूजर्स ?, हे आहे कारण.. title=

मुंबई : Facebook newsfeed algorithm : सोशल मीडियावर फेसबुक विरोधात यूजर्सकडून हल्लाबोल करण्यात येत आहे. याचे कारण म्हणजे, फेसबुक न्यूजफीड अल्गोरिदम बदलला आहे. फेसबुकला त्याच्या न्यूजफीड अल्गोरिदममुळे काही विसंगती दिसून येत आहे. यामुळे अनेक यूजर्स फेसबुकवर संतापलेत आहेत. अल्गोरिदममधील काही विसंगतीचा फटका यूसर्जना बसला आहे. याचा राग यूजर्स काढताना दिसून येत आहे. (Facebook newsfeed algorithm goes bonkers, users peeved over random unrelated posts)

2016 च्या केंब्रिज अ‍ॅनालेटिक घोटाळ्यानंतर (Cambridge Analytica scandal in 2016) योग्य यूजर्सच्या गोपनीयता धोरणांच्या अभावामुळे फेसबुकवर हल्ला होत आहे आणि अनेक दशलक्ष सदस्यांनी फेसबूकला रामराम केला. त्यामुळे अलीकडील तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. आता, फेसबुकला त्याच्या न्यूजफीड अल्गोरिदममध्ये काही विसंगतीचा फटका बसला आहे. लोक तक्रार करत आहेत की त्यांचे न्यूजफीड जगभरातील अनोळखी लोकांच्या असंबंधित पोस्टने भरलेले आहे. त्यामुळे लोक फेसबुकवर आपला राग व्यक्त करताना दिसून येत आहे. अनेकांनी ट्विट करत आपला राग व्यक्त केला आहे.

तसेच अनेकांचे फेसबूक अकाऊंट हॅक होण्याचा प्रकारही वाढला आहे. तसेच अनेकजण अनफॉलो होत असल्याने त्यांना याचा धक्का बसला आहे. आपल्या प्रोफाईलमध्ये कोणीतरी घुसखोरी केल्याचे यूजर्सचे म्हणणे आहे. त्यांनी याबाबत ट्विटही केले आहे.

काहींच्या प्रोफाईलवर विचित्र विनंती, फोटो आणि घाणेरडे शब्दांसह Facebook वर काही प्रसिद्ध सेलिब्रिटींना टॅग करणारे पूर्णपणे अदृष्ट लोक कार्यरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील यूजर्सना वाईट येत आहे. सुरुवातीला, लोकांना वाटले की त्यांचे  अकाऊंट हॅक झाले आहे. परंतु, नंतर लक्षात आले की त्यापैकी बहुतेक समान समस्यांना तोंड देत आहेत. फेसबुकच्या न्यूजफीडमधील विसंगतींची तक्रार करण्यासाठी अनेक लोक ट्विटरवर आपला राग व्यक्त करत आहेत.