किती KM धावल्यानंतर कारची सर्व्हिसिंग करावी? 90 टक्के लोक करतात 'ही' एक चूक

Car Servicing : कार सर्व्हिसिंग कधी करायची हे तुमच्याही लक्षात येत नाही... तर आजच जाणून घ्या योग्य वेळ... नाही तर इतर 90 टक्के लोकांप्रमाणे तुम्ही कराल चूक

दिक्षा पाटील | Updated: Feb 17, 2025, 07:34 PM IST
किती KM धावल्यानंतर कारची सर्व्हिसिंग करावी? 90 टक्के लोक करतात 'ही' एक चूक
(Photo Credit : Social Media)

Car Servicing : लॉन्ग ड्राइव्हसाठी जायला कोणाला आवडत नाही. पण फक्त प्रवासा दरम्यान, रस्त्यात जर तुमची गाडी खराब झाली तर तुम्हाला मज्जा येणारच नाही. अशात तुम्हाला तुमच्या गाडीची सर्विसिंग सतत करावी लागू शकते. पण कार सर्विसिंगला घेऊन लोकांच्या मनात नेहमीच काही तरी गोंधळ असतो. त्यांना कळत नाही की कधी आणि किती वेळानंतर सर्विसिंग करायला हवी, कोणी म्हणत की 1 वर्षानंतर तर कोणी म्हणतं 10,000 किलोमीटर गाडी चालवल्यानंतर. त्यामुळे नेहमीच तुम्ही गोंधळात रहात असाल तर आज त्यामुळे तुमच्या गाडीला किती नुकसान होऊ शकतं त्याविषयी जाणून घेऊया... 

जास्त लोकं त्यांच्या गाडीचा वापर ऑफिसला येण्या-जाण्यासाठी करतात. त्यासाठी त्यांची गाडी ही जास्त किलोमीटर पर्यंतचा प्रवास करतच नाही. त्यामुळे वर्षभरानंतर देखील 5000 किमी पेक्षा जास्त गाडी चालत नाहीय अशात लोकांना वाटतं की जेव्हा गाडी 10,000 किलोमीटर पर्यंत जाते तेव्हा सर्विसिंग करू. अशा परिस्थितीत गाडीची कंडीशन खराब होऊ लागते आणि मग सर्विसिंगसोबत इंजय दुरुस्त करण्यात देखील जास्त खर्च करावा लागू शकतो. तर एक गोष्ट समजून घ्या की गाडीचं इंजन खूप महाग असतं. त्यामुळे जर त्यात थोडी देखील गडबड झाली तर तुम्हाला कारच्या किंमतीपेक्षा इंजन बदलवण्यात पैसे लागतील. त्यामुळे गाडी सर्विसिंगकडे कधीच दुर्लक्ष करु नका. 

मॅकेनिककडे करा चेक

त्यामुळे गाडीला वेळच्या वेळी मॅकेनिककडून चेक करुन घेत जा. जेणेकरून तुमच्या गाडीची कंडिशन पाहता सर्विसिंगची योग्य तारिख ते तुम्हाला सांगतात. जर तुमच्या गाडीची सर्विसिंग योग्य वेळी होत नाही तर तुमच्या गाडीचा मायलेज कमी होऊ शकतो आणि इंजनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे गाडीची सर्विसिंगला घेऊन कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष करु नका.  

हेही वाचा : 'या' रंगाच्या नंबर प्लेटच्या गाडीनं फक्त VIP करतात प्रवास!

इतकंच नाही तर कधीही लॉन्ग ड्राइव्हला जाण्याआधी तुमच्या गाडीचं इंजन आणि इतर दुसऱ्या गोष्टी या चांगल्या परिस्थितीत आहे की नाही याची तपासनी करा. जेणेकरून रस्त्यात तुमची गाडी बंद होण्याची शक्यता ही कमी असते.