राष्ट्रवादी

अकोल्यात बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर अपक्षांना भाव चढणार?

अकोला जिल्ह्यात पाच नगरपालिकांमध्ये निवडणुकीचा ज्वर चढायला सुरुवात झालीय.

Oct 26, 2016, 09:25 PM IST

शरद पवारांवर अजित पवार घसरले, अशी हेडलाइन नका करू - अजित पवार

 आपल्या बिनधास्त आणि रोखठोक वक्तव्याने काही वेळा चर्चेत तर काही वेळा अडचणीत आलेला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा असं काही बोलून गेले की थोड्यावेळाने त्यांना लक्षात आले की काही तरी चुकलं आहे. मग काय त्यांनी मस्करीच्या मूडमध्ये प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 

Oct 26, 2016, 07:04 PM IST

आर.आर. आबांची कन्या राष्ट्रवादी युवतीची अध्यक्ष

माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. यावेळी पक्षाने टाकलेली जबाबदारी पेलण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे, आबांची प्रतिमा सांभाळणे हे मोठे आव्हान असल्याचंही स्मिता पाटील यांनी यावेळी सांगितला.

Oct 26, 2016, 05:45 PM IST

भास्कर जाधवांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीची खेळी

 राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव नाराज असल्याची कुणकुण लागल्याने आता राष्ट्रवादीने आता वेगळीच खेळी केली आहे. भास्कर जाधव यांची  नाराजी दूर करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न सुरू केला आहे.

Oct 26, 2016, 05:21 PM IST

कोकणातील राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव नाराज

राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव नाराज आहेत. माजी आमदार रमेश कदम यांना चिपळूण-संगमेश्वरची जबाबदारी दिल्याने ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.  

Oct 26, 2016, 02:00 PM IST

पेंग्विन मृत्यू : मारुन दाखवले म्हणत राष्ट्रवादीने शिवसेनेला खिजवलं

पेंग्वीनच्या मृत्यूनंतर राजकीय वातावरण तापले आहे. मारुन दाखवले म्हणत राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बॅनरबाजी शहरात दिसत आहे. शिवसेनेची पोस्टर लावून खिल्ली उडविल्याने शिवसैनिकांनी बॅनर फाडलेत.

Oct 26, 2016, 11:38 AM IST

रत्नागिरीत शिवसेनेचे 15 उमेदवार तर राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर

 रत्नागिरी नगर परिषदेसाठी शिवसेनेने आपली 15 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, नगराध्यपदाचा उमेदावर जाहीर केलेला नाही. तर राष्ट्रवादीने उमेश शेट्ये यांना थेट नगराध्यपक्षासाठी उमेदवार जाहीर केलेय.

Oct 26, 2016, 08:56 AM IST

निलंग्याचे नागरिक आजोबा-नातवातल्या युद्धाला कंटाळले?

जिल्ह्यातल्या चार नगरपालिकांपैकी निलंगा नगरपालिकेचा रणसंग्राम चांगलाच रंगणार अशी चिन्ह आहेत. 

Oct 25, 2016, 07:54 PM IST

लातूरवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा वरचष्मा कायम राहणार?

जिल्ह्यातल्या 4 नगरपालिकांच्या निवडणुका येत्या 14 डिसेंबरला होत आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी कंबर कसलीय.

Oct 25, 2016, 07:42 PM IST

नवी मुंबई आयुक्त मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर

नवी मुंबई आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठरावाच्यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेविकांकडून जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. 105 विरुद्ध 6 मतांनी ठराव मंजूर झाला.  

Oct 25, 2016, 12:43 PM IST

आयुक्त मुंढेंविरोधात आज नवी मुंबई पालिकेत अविश्वास प्रस्ताव

नवी मुंबई आयुक्त तुकाराम मुंढेविरोधात आज महापालिकेत अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची मुंढेंविरोधात भूमिका स्पष्ट असल्याने हा ठराव मंजूर होण्याची शक्यता आहे.

Oct 25, 2016, 12:17 PM IST

विधान परिषद निवडणूक : काँग्रेस - राष्ट्रवादीत तिढा कायम

विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपाचा काँग्रेस- राष्ट्रवादीमधील तिढा सुटायला तयार नाही. 

Oct 25, 2016, 09:43 AM IST

पंढरपूर पालिकेवर परिचारक की भालकेंचे वर्चस्व

नगरपालिकांचा रणसंग्राममध्ये सोलापूर जिल्ह्यातली सर्वात मोठी नगरपालिका... सध्या पंढरपूर नगरपालिकेत विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांची नगरविकास आघाडी तर भारत भालके यांची तीर्थक्षेत्र विकास आघाडी आहे.

Oct 24, 2016, 08:51 PM IST