`राज ठाकरे तुमची वेळ चुकीची....`
राज्यात सण ऊत्सव आणि तणावाची परिस्थिती असताना ही मोर्चा काढण्याची वेळ योग्य नसल्याचं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंना उद्देशून म्हटलं आहे.
Aug 19, 2012, 06:46 PM ISTमुंबई दंगल : आबा राजीनामा द्या- राज ठाकरे
मुंबईतील हिंसाचार रोखण्यासाठी राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील आणि पोलीस यंत्रणा पूर्णत: अपयशी ठरली आहे. आर आरना गृहखातं समजलेलच नाही. त्यामुळे पोलीस आयुक्त आणि आर आर यांच्या राजीनाम्यासाठी २१ रोजी मोर्चा काढणार आहोत, अशी माहिती आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Aug 17, 2012, 06:58 PM ISTठाकरे बंधूंनी घेतलं गृहमंत्र्यांना फैलावर
सीएसटी हिंसाचाराच्या मुद्यावरुन आता ठाकरे बंधूंनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.. उद्धव आणि राज ठाकरे यांनी गृहखातं आणि सरकारवर सडकून टीका केलीय. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनीही गृहखात्याचा कारभार टफ मंत्र्यांच्या हातात देण्याची मागणी राज्यपालांकडे केलीय.
Aug 14, 2012, 07:48 AM ISTमतांसाठी दंगलखोरांना मुभा- राज ठाकरे
सीएसटी दंगलप्रकरणी राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा गृहखात्यावर हल्लाबोल केलाय. ‘मतांसाठी दंगलखोरांना पाठिशी घातलं जातंय’, असा आरोप त्यांनी यावेळी केलाय.
Aug 13, 2012, 06:42 PM ISTराज ठाकरेंचा गृहमंत्र्यांवर हल्लाबोल
मुंबईत सीएसटी परिसरात शनिवारी अशांतता निर्माण झाली होती. आज मात्र मुंबईतलं जनजीवर सुरळीत सुरूय..कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. मात्र, राज ठाकरे यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Aug 12, 2012, 09:29 AM ISTराज ठाकरे पुन्हा आक्रमक, सीएमच्या भेटीला
टोलवसुलीला तीव्र विरोध करत राज्यात आंदोलनाची भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
Aug 10, 2012, 04:40 PM ISTराज ठाकरेंवर पुन्हा याचिका दाखल होणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात आता आणखी एक याचिका कोर्टात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या पुन्हा एकदा अडचणी वाढण्याच्या शक्यता नाकारता येत नाही.
Aug 6, 2012, 10:08 AM ISTउद्धव ठाकरेंना 'मनसे' शुभेच्छा!
उद्धव आणि राज ठाकरे या बंधुंमधली कटुता संपून त्यांच्यातल्या नात्यातला जिव्हाळा आज पुन्हा दिसला. शिवसेना सोडल्यानंतर तब्बल सहा वर्षांनंतर प्रथमच राज ठाकरे यांनी उद्धव यांना आज वाढदिवसाला पुष्पगुच्छ पाठवून शुभेच्छा दिल्यात.
Jul 27, 2012, 04:10 PM IST'टोल'साठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा 'झोल'!
मनसेनं टोलनाक्यांवर कशा प्रकारे घोळ चालतो हे उघड केलंय, त्यामुळे आता टोलनाक्यांत काहीच झोल नाही हे सिद्ध करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं कंबर कसली आहे. हा झोल लपवण्यासाठी त्यांनी भन्नाट आयडिया शोधून काढली आहे.
Jul 27, 2012, 12:17 AM ISTबाळासाहेबांसाठी राज ठाकरे 'लिलावती'त
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लिलावती हॉस्पिटलला जाऊन बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतलीय. बाळासाहेब ठाकरेंना श्वसनाचा त्रास होत असल्यानं कालपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Jul 25, 2012, 01:42 PM ISTआजपासून टोल भरू नका, राज ठाकरेंचं आवाहन
नागरिकांनी आजपासून टोल भरणं बंद करावा, यापुढे कुणीही टोल भरू नये, असं आवाहन राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना केलंय. आता नागरिकांच्या मदतीसाठी आणि संरक्षणासाठी मनसे कार्यकर्ते टोल नाक्यांवर उभे राहणार असल्याचंही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलंय.
Jul 24, 2012, 12:01 PM ISTराज ठाकरेंना आणखी एक नोटीस
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई हायकोर्टानं आणखी एक नोटीस बजावलीय. शिवाजी पार्कवर राजकीय सभा घेण्यावर कोर्टानं घातलेल्या बंदीचा अपमान केल्याप्रकरणी राज ठाकरे यांना ही नोटीस बजावण्यात आलीय.
Jul 24, 2012, 08:19 AM IST‘बंधुत्व’ आणि ‘मित्रत्व’
प्रसाद घाणेकर
ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं तमाम मराठी मनांना वाटत असलं तरी उद्धव ठाकरेंच्या एका हृदयाने ते काही काळासाठी का होईना पण केलं. मीडियावाल्यांनी अनेक शक्यतांच्या फटाक्यांची आतषबाजी करत चर्चेला तोंड फोडलं. मग पिंपळपारावरील बैठक तरी कशी मागे राहील. पिंपळपारावरच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटू लागले. आणि त्यांनी विषय निवडला ‘हे मित्रत्व आणि हे बंधुत्व’.
राज की बात !
ऋषी देसाई
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हृद्यावरील ऑपरेशनसाठी केवळ दोन मतप्रवाहच नाही तर सारेच राजकारणीही एक झाले होते.. सा-यांच लक्ष लीलावतीमधून शस्त्रक्रिया यशस्वी होते ही बातमी कधी येते याकडे लक्ष लागलं होत..
राज ठाकरेंच्या घरून उद्धवना जेवणाचा डबा
डॉक्टरांनी काही पथ्थ पाळायला सांगितली आहेत. डॉक्टरांनी सूचविलेल्या पथ्यानुसार तयार केलेल्या जेवणाचा डबा राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला आणि राज यांची आई कुंदा ठाकरे या उद्धव यांच्यासाठी देणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Jul 20, 2012, 11:35 AM IST