राज ठाकरे

...तर, राज यांना मुंबईतून हाकलवू- रामदास आठवले

राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे बिहारमधील मराठी माणसाला कोणी हात लावला तर राज ठाकरेंनाच मुंबईतून हाकलून देण्याची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा आरपीआय अध्यक्ष रामदास आठवलेंनी दिलाय.

Sep 2, 2012, 04:24 PM IST

सर्व गुन्हेगार बिहारचेच- राज

आज रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात भाषण करताना राज ठाकरे यांनी पुन्हा परप्रांतियांवर निशाणा साधला.

Sep 2, 2012, 02:47 PM IST

पाक कलाकारांना का गोंजारायचं?- राज

ज्यावेळी पाकिस्तानी कलाकारांना परत जावं लागेल, तेव्हा त्यांना लाज वाटेल. दुसऱ्या देशात अशी वागणूक मिळाल्यावर ते आपल्या सरकारवर दबाव आणतील, की दहशतवाद थांबवा, कारण त्यामुळे दुसऱ्या देशांत आमची लाज जाते. त्यावेळी पाकिस्तानी सरकार दहशतवाद थांबवेल.

Sep 2, 2012, 02:20 PM IST

राज ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडली

रंगशारदा सभागृहात मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत खुमासदार भाषण केलं.

Sep 2, 2012, 01:54 PM IST

राज… बिहारमध्ये येऊन दाखवा - अबू आझमी

शुक्रवारी राज ठाकरेंनी बिहारच्या मुख्य सचिवांना केलेल्या मज्जावानंतर पलटवार करण्याची संधी सोडतील ते अबू आझमी कसले...

Sep 1, 2012, 06:23 PM IST

'बिहारी राजचं मानसिक संतुलन ढासळलंय'

काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी म्हटले आहे की, राज ठाकरे यांनी आशा भोसले यांची माफी मागितली पाहिजे. राज यांचे मानसिंक संतूलन ढासळले असून वाटेल ते बोलत सुटले आहेत.

Sep 1, 2012, 02:05 PM IST

पाहा काय म्हणाले राज, मला फक्त महाराष्ट्रात रस !

आशाताई कसाबला म्हणतील की, अतिथी देवो भव !, पाक कलाकारांचा कार्यक्रम केल्यास खबरदार, आशाताई भारतातले सगळे कलाकार संपले का?

Aug 31, 2012, 01:39 PM IST

राज ठाकरे हाजीर हो... दिल्ली कोर्टाचा समन्स

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने समन्स बजावले आहे. 2008 रेल्वे भरतीवेळी परप्रांतियांना झालेल्या मारहाण प्रकरणी हे समन्स बजावण्यात आला आहे.

Aug 30, 2012, 06:34 PM IST

राजचा मोर्चा हिंदूचा विश्वासघात- बाळासाहेब

रझा अकादमीच्या कार्यक्रमात मनसेचे आमदार बाळा नांदगावकर सामील झाल्याबद्दल बाळासाहेब ठाकरे यांनी मनसेच्या विराट मोर्चावर टीकास्त्र सोडले आहे. मोर्चा काढणारे पक्ष रझा अकादमीच्या कार्यक्रमात सहभागी होत असतील, तर हा हिंदूंचा विश्वासघात आहे, असा जोरदार हल्ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ` सामना ` च्या अग्रलेखातून केला आहे.

Aug 29, 2012, 07:58 PM IST

पोलिसांचे मनोधैर्य वाढवाः राज ठाकरे

पोलिसांचे मनोधैर्य वाढवा, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांना दिला. मुंबईतील हिंसाचारानंतर पोलिसांना मार खावा लागला होता. तर महिला पोलिसांची छेड काढली गेली होती. याविऱोधात मनसे रस्त्यावर उतरत राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता.

Aug 27, 2012, 07:27 PM IST

राज ठाकरे मनसेच्या नगरसेवकांवर चिडले...

शहरात विरोधी पक्षाचे काही अस्तित्व आहे की नाही? शहराच्या प्रश्नांवर परस्पर निर्णय कसे घेतले जातात’, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या नगरसेवकांची चांगलीच खरडपट्टी काढली.

Aug 26, 2012, 08:45 PM IST

`राज, इंदू मिल मागतोय, कोहिनूर मिल नाही!`

महायुतीत मनसे आल्यास, इतरांना वाटतो तितका फायदा होणार नाही, असं वक्तव्य रिपाइं नेते रामदास आठवले यांनी केलंय. मनसेला सध्या जेवढी मते मिळतात, तितकी मते महायुतीत आल्यावर त्यांना मिळणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय. तसंच इंदू मिलची जागा मागतोय कोहिनूर मिलची नाही, असा टोलाही त्यांनी लगावलाय.

Aug 24, 2012, 07:58 PM IST

...तो दाग अच्छे है।

कुछ अच्छा होना होगा तो दाग अच्छे है...एका वॉशिंग पावडरच्या जाहिरातील हे वाक्य आठवण्याचं कारण आहे सध्याची राज्यतील राजकीय परिस्थिती. उद्धव ठाकरे यांच्या आजारपणामुळे ठाकरे कुटुंबीय लिलावतीत एकत्र आले. गेली काही वर्षे विस्तव न जाण-या दोन भावांमधील प्रेम थेट मातोश्रीपर्यंत पोहोचलं.

Aug 24, 2012, 09:41 AM IST

अजितदादा गृहखातं घेऊन टगेगिरी दाखवा - राज

राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यावर आपले ठाम मत मांडले.

Aug 23, 2012, 06:57 PM IST

आरपीआय कार्यकर्ते आणि मनसैनिक आमने-सामने

आरपीआय कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मुंबईतल्या कृष्णकुंज निवासस्थानावर काढलेल्या मोर्चावेळी आरपीआय कार्यकर्ते आणि मनसे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्य हाणामारीवर उतरले.

Aug 23, 2012, 04:57 PM IST