भारत vs बांगलादेश सामन्यात कशी असणार दुबईची खेळपट्टी? गोलंदाज की फलंदाज कोणाचं वर्चस्व? पाहा पिच रिपोर्ट..

Champions Trophy 2025, IND vs BAN Dubai Pitch Report:  टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहेत. 20 फेब्रुवारी रोजी टीम इंडिया स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेश विरुद्ध खेळेल.

पुजा पवार | Updated: Feb 19, 2025, 10:16 AM IST
भारत vs बांगलादेश सामन्यात कशी असणार दुबईची खेळपट्टी? गोलंदाज की फलंदाज कोणाचं वर्चस्व? पाहा पिच रिपोर्ट..
(Photo Credit : Social Media)

Champions Trophy 2025, IND vs BAN Pitch Report, Dubai Weather Forecast: 19 फेब्रुवारी पासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) सुरु होणार आहे. यंदा ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवण्यात येणार असून याचे सामने पाकिस्तान आणि दुबईत खेळवले जातील. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहेत. 20 फेब्रुवारी रोजी टीम इंडिया स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेश विरुद्ध खेळेल. तेव्हा दुबईतील खेळपट्टीचा रिपोर्ट कसा आहे यावर कोणाचं वर्चस्व राहील याबाबत जाणून घेऊयात. 

दुबई कसा आहे भारताचा इतिहास? 

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया सर्व सामने हे दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळेल.  भारताचा पहिला सामना हा बांगलादेश विरुद्ध होणार आहे. परंतु मागील काही सामन्यांचा इतिहास पहिला तर दुबई स्टेडियमवरील पिचवर भारताचा रेकॉर्ड चांगला नाही. टी 20 वर्ल्ड कप 2021 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाला याच मैदानावर अधिक पाकिस्तान आणि नंतर न्यूझीलंडकडून पराभव मिळाला होता. यावेळी भारताकडे यजमानपद असूनही टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पोहोचणं शक्य झालं नव्हतं. 

हेही वाचा : 19 फेब्रुवारी सुरु होणार चॅम्पियन्स ट्रॉफी, 'या' संघांमध्ये होणार पहिली मॅच, कुठे पाहता येणार Live?

 

भारत vs बांगलादेश सामन्यात कशी असेल दुबईची खेळपट्टी? पाहा पिच रिपोर्ट..   

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील (Dubai International Stadium) खेळपट्टीवर भारताला यापूर्वी चांगलं यश मिळालेलं नसलं तरी आता माहोल बदलला आहे. रिपोर्टनुसार आता दुबईमध्ये भारताला मिळणारी खेळपट्टी सुद्धा बदलली आहे. दुबई स्टेडियमवर दोन अशा फ्रेश खेळपट्ट्या आहेत ज्यांचा वापर मागील कोणत्याही सामन्यांमध्ये केला गेला नव्हता. रिपोर्टमध्ये दावा केला गेला आहे की दुबईची खेळपट्टी ही पहिल्या सारखी संथ नसेल. खेळपट्टी थोडी वेगवान असणार असून याचा फिरकीपटूंना जास्त फायदा होईल. जर फिरकीपटूंनी बॉल थोडा वेगात टाकला तर त्यांना विकेट मिळवण्यासाठी खेळपट्टीचा चांगला उपयोग होईल. 

जर हा रिपोर्ट योग्य असेल तर रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती सह अक्षय पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे सुद्धा इथं विकेट्स काढतील. याचमुळे कदाचित टीम इंडियाच्या सिलेक्टर्सनी 5 फिरकीपटूंना संघात सामील केले. वेगवान गोलंदाजांना सुद्धा विकेट मिळवण्यासाठी अनेक संधी मिळतील. परंतु जर फलंदाज मैदानात जम बसवण्यात यशस्वी ठरला तर मोठ्या धावा करूशकतील. त्यामुळे जो संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी उतरेल त्यांना याची काळजी घ्यावी लागेल की कोणताही गोलंदाज अधिककाळ मैदानात टिकू नये. 

भारतीय संघ कोणत्या ग्रुपमध्ये? 

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 8 संघांचा सहभाग असून या संघांना 2 ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. ग्रुप ए मध्ये टीम इंडिया सह पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांग्लादेशचा समावेश आहे. तर ग्रुप बी मध्ये दक्षिण अफ्रीका, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान, इंग्लंड हे आहेत. प्रत्येक संघ ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येकी तीन सामने खेळतील. यातील प्रत्येक ग्रुपमध्ये टॉप दोनवर राहणारे संघ सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील आणि सेमी फायनल जिंकणारे संघ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी फायनलमध्ये लढतील. 

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उप-कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, वॉशिंगटन सुंदर.

नॉन-ट्रॅवलिंग सब्स्टीट्यूट: यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे